शार्दुल म्हणजे शांतीत क्रांती, तोच टी 20 मालिकेचा खरा हिरो, झहीर खानकडून कौतुक
शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत (india vs england t2oi series) सर्वाधिक 8 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
अहमदाबाद : भारताने इंग्लंडचा 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत (India vs England T2oI Series) 3-2 ने शानदार विजय मिळवला. भारताचा 2019 पासूनचा सलग 6 वा टी 20 मालिका विजय ठरला. या मालिकेत अनेक खेळाडूंनी विजयी भूमिका साकरली. यामध्ये इशान किशन, सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादव, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरचा समावेश होता. तसेच गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी केली. पण टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदान (Zaheer Khan) झहीर खाननुसार शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा या मालिका विजयाचा हिरो आहे. झहीरनुसार शार्दुलने भारताच्या मालिका विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. (India Vs England t20i series 2021 Shardul Thakur Is Silent Hero says Zaheer Khan)
झहीर काय म्हणाला?
“संघात विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवसारखे तगडे फलंदाज होते. त्यानंतरही शार्दुलने उल्लेखनीय कामगिरी केली. इतर खेळाडूंच्या तुलनेच शार्दुलचे आकडे चांगले आहेत. शार्दुलने निर्णायक क्षणी विकेट्स घेतल्या. त्याचा टीम इंडियाला फायदा झाला,” असं झहीरने नमूद केलं. शार्दुलने चौथ्या टी सामन्यात बेन स्टोक्स आणि कर्णधार इयोन मॉर्गनला महत्वाच्या वेळी बाद केलं होतं.
ब्रिस्बेन कसोटीमुळे विश्वास वाढीस
“ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर शार्दुलच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. ब्रिस्बेन कसोटीमुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच्या देहबोलीत सकारात्मक बदल झाला आहे. कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि कशावर लक्ष द्यायचं हे शार्दुलला चांगलंच माहिती आहे”, असंही झहीरने स्पष्ट केलं. शार्दुलने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत निर्णायक क्षणी अर्धशतकी भागीदारी केली होती. तसेच वॉशिंग्टन सुंदरसोबत सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली . या अर्धशतकामुळे आणि शतकी भागीदारीमुळे सामन्याला कलाटणी मिळाली होती. या दोघांनी टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता.
मागील 3 मालिकांमध्ये सर्वाधिक विकेट्स
शार्दुल या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. शार्दुलने 5 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या. यापैकी 6 विकेट्स या चौथ्या आणि पाचव्या सामन्यात मिळवल्या. याआधी न्यूझीलंड विरुद्ध 2020 मध्ये 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. यात त्याने 8 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. तसेच श्रीलंके विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता.
संबंधित बातम्या :
(India Vs England t20i series 2021 Shardul Thakur Is Silent Hero says Zaheer Khan)