India vs England 2021 | क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज, स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामना पाहता येणार

केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार टीएनसीएने (TNCA) हा निर्णय घेतला आहे.

India vs England 2021 | क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज, स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामना पाहता येणार
एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 11:03 AM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात (England Tour India 2021) होत आहे. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA CHIDAMBARAM STADIUM) खेळण्यात येणार आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया मायभूमीत क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. अनेक महिन्यांनंतर भारतात सामना होत असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्येही (cricket fans) उत्साहाच वातवरण आहे. या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चाहत्यांना इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला स्टेडिमयमध्ये उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद लुटता येणार आहे. सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (india vs england test series cricket fans allowed in stadium 2nd test match after government new guidelines)

काही दिवसांपूर्वी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (TNCA)ने पहिल्या 2 सामन्यांसाठी प्रेक्षकांसह क्रिकेट क्लबच्या सदस्यांनाही स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान आता केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, दुसऱ्या सामन्यासाठी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमची क्षमता ही एकूण 50 हजार इतकी आहे. त्यानुसार 50 टक्के प्रेक्षक म्हणजेच 25 हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

टीएनसीएची भूमिका काय?

“या संदर्भातील मार्गदर्शक तत्वांची माहिती आम्हाला 30 जानेवारीला प्राप्त झाली. पहिल्या कसोटीसाठी आता फार वेळ उरला नाही. पहिला सामना 5 फेब्रुवारीपासून खेळण्यात येणार आहे. यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी दुसऱ्या सामन्यांपासून करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया टीएनसीएच्या अधिकाऱ्याने एएनआयला दिली.

दरम्यान या मालिकेआधी दोन्ही संघ चेन्नईतील लिला हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. क्वरांटाईन कालावधी संपल्यानंतर या दोन्ही संघांना नेट्समध्ये सराव करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. काही खेळाडू हे आता आपल्या हॉटेलमधील रुममध्येच शक्य तो सराव करत आहेत. तर इंग्लंडच्या बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आमि रेरी बर्न्सला नेट्स प्रकॅटिस करण्याची परवानगी मिळाली आहे. या तिन्ही खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी संपल्याने त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना-चेन्नई-5-9 फेब्रुवारी दूसरा सामना – चेन्नई-13ते17 फेब्रुवारी तिसरा सामना-अहमदाबाद- 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना-अहमदाबाद-4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

IND vs ENG | इंग्लंडविरुद्धच्या कसोटींसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही, TNCA चा मोठा निर्णय

(india vs england test series cricket fans allowed in stadium 2nd test match after government new guidelines)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.