Ind Vs Eng Third Test : जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर भारत-इंग्लंड आमनेसामने, पाहा कुठे आणि कधी सामना?

भारत आणि इंग्लंड (India Vs England) यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून अहमदाबाच्या मोटेरा मैदानावर (Ahmedabad Motera Cricket Stadium) खेळवला जाणार आहे.

Ind Vs Eng Third Test : जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर भारत-इंग्लंड आमनेसामने, पाहा कुठे आणि कधी सामना?
India Vs ENgland 3rd test
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 11:35 AM

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड (India Vs England) यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून अहमदाबाच्या मोटेरा मैदानावर (Ahmedabad Motera Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना डे नाईट असणार आहे. दोन्ही संघांसाठी हा कसोटी सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. पिंक बॉलने (Pink Ball) हा सामना खेळला जाईल. दुपारी अडीज वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. (India Vs England third test Match 2021 When And Where to watch live Steaming)

भारताने आपला पहिला डे नाईट सामना 2019 ला बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डनवर (Kolkata Eden Garden) खेळला होता. या मॅचमध्ये भारताने बाजी मारली होती. त्यानंतर आता दुसरा डे नाईट सामना इंग्लंड विरुद्ध मोटेरा स्टेडिअमवर (Motera Stadium) भारत खेळणार आहे.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकून ही स्पर्धा उत्कंठावर्धक केली आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंडने भारतीय संघाला पराभवाची धुळ चारली तर चेन्नईच्याच मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 317 धावांनी पराभव करुन पहिल्या पराभवाची व्याजासकट परतफेड केली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस पर होणार आहे. तसंच जिओ टीव्ही आणि एररटेल टीव्हीवरही होणार आहे.

फिरकीपटूंचा बोलबाला राहणार

ही मॅच गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. या मोटेरा स्टेडियमवरील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळणार आहे.

भारताकडे चार फिरकी गोलंदाज

टीम इंडियाकडे आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यासारखे चार फिरकी गोलंदाज आहेत. यामुळे हे फिरकीपटू तिसऱ्या सामन्यात या पिचवर कशी कामगिरी करतात, याकडे सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान या कसोटी मालिकेत आतापर्यंत 2 सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी प्रत्येकी 1 सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे. यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे हा तिसरा कसोटी सामना मालिकेच्या आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम

जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक क्राउले, रोरी बर्न्स , बेन स्टोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबले, बेन फोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड

(India Vs England third test Match 2021 When And Where to watch live Steaming)

हे ही वाचा :

IND vs ENG 3rd Test : इतिहास बदलण्यासाठी मोटेरा सज्ज, राष्ट्रपतींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या मैदानाचं उद्घाटन

Ind vs Eng T 20 Series | 1 ओव्हरमध्ये 5 सिक्स खेचत टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं, ‘हा’ खेळाडू टी 20 मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढण्यासाठी सज्ज

क्रिकेट की बॅडमिंटन? होता द्विधा मनस्थितीत, IPL मधून घरोघरी पोहचला, आता टीम इंडियाकडून खेळणार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.