Ind Vs Eng : पुण्यात पहिला एकदिवसीय सामना, हे 4 धुरंधर टीम इंडियाची बाजी पलटवू शकतात!
टीम इंडियाकडे असे धुरंधर खेळाडू आहेत जे सामना कोणत्याही क्षणी पलटवू शकतात. ते 4 फलंदाज कोणते त्यांच्यावर आपण नजर टाकूयात... India Vs England
पुणे : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (23 मार्च) पहिला एकदिवसीय (India vs England 1st ODI) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमध्ये हा सामना पार पडणार आहे. टीम इंडियाकडे असे धुरंधर खेळाडू आहेत जे सामना कोणत्याही क्षणी पलटवू शकतात. ते 4 फलंदाज कोणते त्यांच्यावर आपण नजर टाकूयात… (India Vs England Virat kohli MCA pune match Winner player India)
विराट कोहली (Virat Kohli)
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टी -20 मालिकेत कर्णधार विराट कोहली टीम इंडियाच्या मालिका विजयाचा एक नायक होता. कोहलीने टी 20 मालिकेत सर्वाधिक 231 धावा ठोकल्या. कोहली टी -20 मालिकेत ‘मॅन ऑफ द सीरिजाचा मानकरीही ठरला. जर कोहलीची बॅट इंग्लंड विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात चालली, तर भारताला विजयापासून कुणीही रोखू शकत नागी. पुण्यात विराट कोहलीने सर्वाधिक 319 धावा केल्या आहेत. पुण्यात विराट कोहलीने दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकले आहे. या मैदानावर विराट कोहलीची फलंदाजी सरासरी 80 च्या आसपास आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma)
टीम इंडियाचा ओपनर फलंदाज रोहित शर्मा देखील तुफान फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सर्वांत मोठा मॅचविनर खेळाडू मानला जातो. एकदिवसीय सामन्यांत रोहितच्या नावावर तीन तिहेरी शतक आहेत. तसंच तीन त्रिशतक ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. पुण्याची खेळपट्टी बॅटिंगसाठी सर्वोत्तम मानली जाते. जर आजच्या मॅचमध्ये रोहितच्या बॅटच्या जादू बघायला मिळाली तर भारतासाठी विजय सोपा होईल.
भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar kumar)
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने इंग्लंडविरुद्धच्या टी 20 मालिकेत शानदार कामगिरी केली. शानदार पुनरागमन करत त्याने भारताच्या मालिका विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याच्या बोलिंगमध्ये जुना स्विंग तसंच वेगही दिसला. अखेरच्या टी ट्वेन्टी सामन्यात भुवी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. भुवीने 4 ओव्हरमध्ये 15 रन्स देऊन 2 महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. महत्त्वाच्या वेळी दिग्गज बॅट्समनना तंबूत धाडण्याचं काम भुवी मोठ्या खुबीने करतो. आजही त्याच्या बोलिंगवर तमाम क्रिकेट रसिकांची नजर असेल.
हार्दिक पांड्या (Hardik Pandya)
हार्दिक पांड्या आपल्या बॅटिंगने सगळ्यांचीच मने जिंकतोय. अगदी कमी बॉलमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यासाठी हार्दिक ओळखला जातो. आजही शेवटच्या काही ओव्हर्समध्ये त्याने जर तुफान बॅटिंग केली तर भारताला विजय मिळवणं सोपं होईल.
(India Vs England Virat kohli MCA pune match Winner player India)
हे ही वाचा :
Rohit Sharma : वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडण्यासाठी हिटमॅन रोहित शर्मा सज्ज
KL राहुलच्या टीकाकारांना विराट कोहलीचं गाण्यातून प्रत्युत्तर, कोणतं गाणं म्हटला विराट?