IndvsNZ T20 Live: टीम इंडियाचा दणक्यात विजय, राहुल, श्रेयसची धडाकेबाज अर्धशतकं

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्स राखून दणक्यात विजय मिळवला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

IndvsNZ T20 Live:  टीम इंडियाचा दणक्यात विजय, राहुल, श्रेयसची धडाकेबाज अर्धशतकं
Follow us
| Updated on: Jan 24, 2020 | 3:52 PM

ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्स राखून दणक्यात विजय मिळवला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने घरच्या मैदानात तुफान फटकेबाजी करत, 20 षटकात 5 बाद 203 धावांचा डोंगर उभा केला होता. टीम इंडियाने 204 धावांचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात 1 ओव्हर राखून पार केलं. के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची झंझावाती अर्धशतकांमुळे भारताला या सामन्यात सहज विजय मिळवता आला.

भारताकडून सलामीवीर के एल राहुलने 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावा ठोकल्या. तर कर्मधार विराट कोहलीने 32 चेंडूत 45 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने अंतिम षटकात धडाकेबाज फटकेबाजी करत, अर्धशतक झळकावलं आणि विजयाला गवसणी घातली. 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने अतिउंच षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रेयसने 29 चेंडूत 58 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला ( India vs New Zealand first T 20) आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला टी 20 सामना न्यूझीलंडमधील ऑकलंड इथं झाला. या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाजीला मैदानात उतरले. मार्टिन गप्टील आणि कोलीन मुनरो या दोघांनी 80 धावांची सलामी दिली. मुनरोने 59, कर्णधार विल्यमनने 26 चेंडूत 51 तर रॉस टेलरने 27 चेंडूत 54 धावा ठोकल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 20 षटकात 203 धावा करता आल्या.

भारताकडून मोहम्मद शमी वगळता सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

वन डे विश्वचषक 2019 मध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा टीम इंडिया मालिका जिंकून काढते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवन या मालिकेतून बाहेर पडला आहे.  त्याच्याऐवजी 16 जणांच्या संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसनला अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळवण्यासाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे.

आजच्या सामन्यात  रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांना संधी देण्यात आली होती. ऋषभ पंतला आजही स्थान मिळालेलं नाही.

न्यूझीलंड दौऱ्यात भारत 5 टी20, 3 वन डे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला टी 20 सामना आज होत आहे.  येत्या काही महिन्यात टी 20 विश्वचषकाची लढाई सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून महत्त्वाचा सराव करता येणार आहे.

भारताने न्यूझीलंडमध्ये अद्याप एकही टी 20 मालिका जिंकलेली नाही. भारतीय संघ गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात टी 20 मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाली होती. त्यावेळी भारताचा 1-2 असा पराभव झाला होता. आता टीम इंडियाला इतिहास बदलण्याची संधी आहे.

दुखापतीमुळे शिखर धवन बाहेर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूजीलंड दौऱ्यासाठी वन डे आणि टी 20 संघ जाहीर केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या सलामीवीर फलंदाज शिखर धवनला या दौऱ्यातून वगळण्यात आलं आहे. त्याच्याऐवजी वन डे मालिकेसाठी पृथ्वी शॉ तर टी 20 साठी यष्टीरक्षक संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आलं आहे.

 भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कगलेजिन, कोलिन मुनरो, कोलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डार्ली मिशेल, मिशेल सँटनर, टीम सेफर्ट (विकेटकीपर), हामीश बेनेट, ईश सोढी, टीम साऊदी, ब्लेयर टिकनेर

न्यूझीलंड दौरा : टी-20 वेळापत्रक

1. पहिला टी-20 सामना : ऑकलँड – 24 जानेवारी

2. दुसरा टी-20 सामना : ऑकलँड – 26 जानेवारी

3. तिसरा टी-20 सामना : हॅमिल्टन – 29 जानेवारी

4. चौथा टी-20 सामना : वेलिंग्टन – 31 जानेवारी

5. पाचवा टी-20 सामना : माऊंट माउंगानुई – 2 फेब्रुवारी

न्यूझीलंड दौरा : एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक

1. पहिला वनडे सामना : हॅमिल्टन – 5 फेब्रुवारी

2. दुसरा वनडे सामना : ऑकलँड – 8 फेब्रुवारी

3. तिसरा वनडे सामना : माऊंट माउंगानुई – 11 फेब्रुवारी

न्यूझीलंड दौरा : कसोटी सामने वेळापत्रक

1. पहिला कसोटी सामना : वेलिंग्टन – 21 ते 25 फेब्रुवारी

2. दुसरा कसोटी सामना : क्राइस्टचर्च – 29 फेब्रुवारी ते 4 मार्च

संबंधित बातम्या   

मुंबईकरांचा दबदबा, न्यूझीलंड दौऱ्यासाठी 5 मुंबईकर भारतीय संघात

न्यूझीलंड दौऱ्यासाठी संजू सॅमसन; पृथ्वी शॉला संधी, धडाकेबाज सलामीवीर बाहेर 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.