विश्वचषकाच्या पहिल्याच सराव सामन्यात भारताचा दारुण पराभव

लंडन : ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाचा विश्वचषकापूर्वी पहिला सराव सामना झाला. यामध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून सहा विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. न्यूझीलंडला विजयासाठी अवघं 180 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. चार विकेट गमावत न्यूझीलंडने हे आव्हान पार केलं आणि सहा विकेट्सने विजय मिळवला. भारताने अगोदर फलंदाजी केली. सलामीवीर जोडी […]

विश्वचषकाच्या पहिल्याच सराव सामन्यात भारताचा दारुण पराभव
Follow us
| Updated on: May 25, 2019 | 9:33 PM

लंडन : ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाचा विश्वचषकापूर्वी पहिला सराव सामना झाला. यामध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून सहा विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. न्यूझीलंडला विजयासाठी अवघं 180 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. चार विकेट गमावत न्यूझीलंडने हे आव्हान पार केलं आणि सहा विकेट्सने विजय मिळवला.

भारताने अगोदर फलंदाजी केली. सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन प्रत्येकी दोन धावा करुन माघारी परतले. त्यानंतर विराट कोहलीने 18 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण विराटच्या अगोदरच केएल राहुल सहा धावांवर बाद झाला. विराट कोहलीलाही 11 व्या षटकात ग्रँडहोमने माघारी पाठवलं आणि भारताचा डाव गडगडला.

भारताची धावसंख्या 3 बाद 34 अशी असताना विराटही माघारी परतला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने 30 धावा केल्या आणि डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला महेंद्रसिंह धोनीनेही (17) साथ दिली. पण ही भागीदारी पुढे जाऊ शकली नाही. अखेर रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्या भागीदारीमुळे भारताला 179 धावांपर्यंत मजल मारता आली. 39.2 षटकांमध्ये भारताने सर्व बाद 179 धावा केल्या.

यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने चांगली सुरुवात करुन दिली. पण केन विल्यम्सन (67) आणि रॉस टेलर (71) यांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताच्या विजयाचं स्वप्न भंगलं. सहा विकेट राखून न्यूझीलंडने सराव सामन्यात भारतावर मात केली. भारताचा पुढचा सराव सामना 28 तारखेला बांगलादेशविरुद्ध होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.