India vs New Zealand : …तर सेमीफायनल न खेळताच भारत फायनलमध्ये जाणार
भारत वि. न्यूझीलंड या दोन संघांतला सामना पावसामुळे याआधी सामना रद्द झाला होता. दरम्यान उद्या फायनलसाठी होणाऱ्या लढतीतही पावसाने खोडा घातला तर काय होईल असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
लंडन : यंदाच्या विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला सेमीफायनल सामना उद्या (9 जुलै) होणार आहे. इंग्लंडच्या मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या विश्वचषकात न्यूझीलंड एकमेव असा संघ आहे, ज्यासोबत भारताचा सामना झाला नाही. याआधीही पावसामुळे या दोन संघांमधला सामना रद्द झाला होता. उद्या फायनलसाठी होणाऱ्या लढतीतही पावसाने खोडा घातला तर काय होईल असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
मात्र टेन्शन घेऊ नका, कारण उद्या होणार सामना पावसामुळे रद्द झाला तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (10 जुलै) खेळवण्यात येईल. पण जर 10 तारखेलाही पाऊस झाला. तर मात्र आयसीसीच्या नियमाप्रमाणे दोन्ही टीमला नियमाप्रमाणे प्रत्येकी एक-एक गुण दिले जातील. त्यामुळे टीम इंडियाच्या खात्यात एक वाढीव गुण मिळेल आणि भारत 16 गुणांवर पोहोचेल. तर दुसरीकडे न्यूझीलंडकडे 11 गुण असल्याने त्यांचा 1 गुण वाढून एकूण गुणसंख्या 12 वर पोहोचेल. म्हणजेच जरी हा सामना रद्द झाला, तरी टीम इंडियाला याचा फायदा होईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या पहिल्या सेमीफायनलासाठी क्रिकेटचे चाहते फार उत्सुक आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
The final #CWC19 standings table!
A loss to South Africa in Manchester means Australia finish second on the points table behind India. pic.twitter.com/cIMNDM4utP
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 6, 2019
दरम्यान सध्या गुणतालिकेत भारताने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. यामुळे चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताचा सेमीफायनलचा होईल. तर गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड विरूद्ध आॅस्ट्रेलिया दुसरी सेमीफायनल होईल. विशेष म्हणजे या विश्वचषकात न्यूझीलंड एकमेव असा संघ आहे, ज्यासोबत भारताचा सामना झाला नाही. याआधीही पावसामुळे या दोन संघांमधला सामना रद्द झाला होता.
भारत वि. न्यूझीलंड पहिली सेमीफायनल मँचेस्टरमध्ये 9 जुलैला खेळवण्यात येईल. तर आॅस्ट्रेलिया वि. इंग्लंड हा दुसरा सेमीफायनल 11 जुलैला होईल आणि दोन विजयी संघ विश्वविजेता होण्यासाठी 14 तारखेला लाॅर्ड्सवर भिडतील.