तब्बल आठ वर्षांनंतर भारत-पाक क्रिकेट मालिका, ICC च्या बैठकीकडे नजरा

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यावर्षी 3 सामन्यांची टी -20 मालिका खेळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

तब्बल आठ वर्षांनंतर भारत-पाक क्रिकेट मालिका, ICC च्या बैठकीकडे नजरा
India vs Pakistan
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 2:49 PM

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यावर्षी 3 सामन्यांची टी -20 मालिका खेळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. जर तसे झाले तर 8 वर्षांनंतर दोन्ही संघ द्विपक्षीय मालिकेत खेळतील. उभय संघांमधील शेवटची टी -20 आणि एकदिवसीय मालिका डिसेंबर 2012 मध्ये खेळवली गेली होती. 2012 मधली टी -20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका पाकिस्तानने 2-1 ने जिंकली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना उभय संघांमधील मालिकेसाठी तयारी करण्यास सांगितले आहे. (India vs Pakistan T20I series possible, PCB preparing, All eyes on the ICC meeting)

पुढील आठवड्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत यावर चर्चा होऊ शकते, तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 30 मार्चला भारतीय परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री यांची भेट होण्याची शक्यता आहे. यावेळी, दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिकेस सहमती दर्शविली जाऊ शकते.

पाकिस्तानी वृत्तपत्र डेली जंगच्या वृत्तानुसार यावर्षी दोन्ही देशांमधील स्पर्धा शक्य आहे. या वृत्तपत्राने पीसीबीमधील एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, आधी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. पण नंतर त्याने सांगितले की दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी -20 मालिका खेळवली जाऊ शकते आणि त्यासाठी 6 दिवसांच्या विंडोचा (दोन्ही देशांच्या ठरलेल्या आगामी वेळापत्रकामध्ये तीन सामने खेळवता येतील यासाठी 6 दिवसांचा कालावधी) शोध सुरू आहे.

2012-13 मध्ये पाकिस्तानचा भारत दौरा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळवण्याचे निश्चित झाल्यास भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर येईल, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. कारण 2012-13 मध्ये दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर गेला होता.

पीसीबीच्या अध्यक्षांनी वृत्त फेटाळले

पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी याबातच्या वृत्ताचे स्पष्टपणे खंडन केले आहे. एका वाहिनीवरील मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की, या मालिकेसंदर्भात अद्याप कोणीही त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) त्यांच्याशी काही बोलले नाही.

विश्वचषकापूर्वी टी-20 मालिका

इंग्लंडविरुद्ध टी -20 मालिकेतील पाचव्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आणखी काही टी -20 मालिकांचा उल्लेख केला होता. विराट म्हणाला होता की, टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी आणखी काही टी-20 मालिकांच्या आयोजनाबद्दल क्रिकेट बोर्ड विचार करत असल्याचे त्याने सांगितले होते.

बिझी शेड्यूलमधून वेळ काढावा लागणार

सध्या टीम इंडियाचे वेळापत्रक खूप टाईट आहे. आयपीएलचे 14 वे सत्र 9 एप्रिलपासून खेळवले जाणार आहे. ही स्पर्धा 30 मे रोजी संपेल. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 18 ते 22 जून दरम्यान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडला जावे लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाला बिझी शेड्यूलमधून वेळ काढावा लागणार आहे.

जुलै किंवा सप्टेंबरमध्ये टी-20 मालिका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर जुलैमध्ये भारताकडे एक महिन्याचा मोकळा वेळ असेल. ही विंडो भारत-पाकिस्तान मालिकेसाठी वापरली जाऊ शकते. यानंतर भारताला ऑगस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिकादेखील खेळायची आहे.

ही मालिका 14 सप्टेंबर रोजी संपेल. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर आणि ऑक्टोबरमध्ये विश्वचषक सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला जवळपास 1 महिना मिळे. या विंडोचा वापर उभय देशांमध्ये टी -20 मालिका खेळवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

दोन्ही संघांमधील अखेरचा टी -20 सामना 2016 in मध्ये झाला होता

भारत आणि पाकिस्तानने 9 वर्षांपासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळवली गेलेली नाही. 2007-08 च्या मालिकेनंतर दोन्ही देशांमध्ये कसोटी मालिका खेळवण्यात आलेली नाही. तथापि, दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरूद्ध खेळतात. या दोघांमधील शेवटचा टी – 20 सामना 19 मार्च 2016 रोजी खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत केले होते.

संबंधित बातम्या

Video | पदार्पणात अर्धशतकी खेळी, वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर, हार्दिकला मिठी मारत कृणाल रडला

148 KMPH वेगाच्या बॉलचा उजव्या हातावर फटका, रोहित शर्मा मैदानावर वेदनेने व्हिव्हळला

(India vs Pakistan T20I series possible, PCB preparing, All eyes on the ICC meeting)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....