Rishabh Pant : भारतीय संघात आज बदल होण्याची शक्यता, दिनेश कार्तिकला मिळू शकते संधी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ज्यावेळी ऋषभ पंत चुकीचा फटका मारल्यानंतर बाद झाला. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि पंत यांच्यात काहीतरी बोलणं सुरु असल्याचं व्हिडीओत दिसत होतं.
आज भारताचा (India) सामना श्रीलंकेविरुद्ध (Srilanka) होणार आहे. आजचा सामना अत्यंत अटीतटीचा होणार आहे. आज भारतीय संघाला हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघात बदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऋषभ पंत चुकीच्या फटक्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी दिनेश कार्तिकला (Dinesh Kartik) संधी मिळणार आहे.
माजी क्रिकेट खेळाडूंनी ऋषभ पंतवरच्या शॉटवरती शंका उपस्थित केली आहे. त्यामध्ये रवी शास्त्री, गौतम गंभीर, वसिम अक्रम यांनी भारत पाकिस्तान मॅच संपल्यानंतर शंका उपस्थित केली होती. त्यामुळे त्याचा आज संघात स्थान मिळणार की नाही यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ज्यावेळी ऋषभ पंत चुकीचा फटका मारल्यानंतर बाद झाला. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि पंत यांच्यात काहीतरी बोलणं सुरु असल्याचं व्हिडीओत दिसत होतं. चुकीच्या शॉट मारल्यामुळे रोहित शर्मा संतापला अशी नेटकऱ्यांची चर्चा होती.