शिखर-पृथ्वी सलामीवीर, पांड्या ब्रदर्स मधल्या फळीत, श्रीलंका दौऱ्यासाठी दिग्गजाची भारतीय टीम, पाहा कुणा-कुणाला संधी
हर्षा भोगलेने श्रीलंका दौऱ्यासाठी एकदिवस आणि टी ट्वेन्टी सामन्यांसाठी आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. (India vs Srilanka Odi t20 series Harsha bhogle Playing Xi)
मुंबई : भारताचा एक संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जातोय तर जुलै महिन्यात भारताचा नवोदित संघ श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Of Sri Lanka) तीन वनडे आणि तीन टी-20 मॅच खेळणार आहे. आणखी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही परंतु भारताचे अनेक दिग्गज आपापल्या परीने प्लेईंग इलेव्हनची घोषणा करतायत. माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay manjarekar) आणि आकाश चोप्राने (Akash Chopra) याअगोदर श्रीलंका दौऱ्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. आता यामध्ये भर पडली आहे ती दिग्गज समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) याची… हर्षा भोगलेने श्रीलंका दौऱ्यासाठी एकदिवस आणि टी ट्वेन्टी सामन्यांसाठी आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. (India vs Srilanka Odi t20 series Harsha bhogle Playing Xi)
हर्षाने कुणाकुणाला दिलीय संधी?
हर्षा भोगले यांनी क्रीकबज वेबसाईटशी बातचीत करताना आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. यामध्ये आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसंग आणि सूर्यकुमार यादवला एकदिवसीय सामन्यांसाठी त्यांनी स्थान दिलंय. तर टी-20 मध्ये राहुल तेवतिया, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये हर्षाने स्थान दिलंय. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये हर्षा भोगलेने हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या यांना स्थान देत दोन्ही भावांची दावेदारी सांगितली आहे.
एकीकडे मनीष पांडेला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात प्लेइंग इलेव्हन मध्ये हर्षाने जागा दिली आहे तर टी-20 क्रिकेटमध्ये मनीष पांडेवर हर्षाने विश्वास दाखवला नाही. दुसरीकडे हर्षा भोगलेने मनीष पांडे, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना वनडे टीम मध्ये स्थान दिलंय. तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अंतिम 11 मध्ये कुलदीपला हर्षाचा विश्वास जिंकता आलेला नाही.
शिखर धवन-पृथ्वी शॉ सलामीवीर म्हणून धुमाकूळ करणार, हर्षाला विश्वास
हर्षा भोगलेने एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये शिखर धवन आणि पृथ्वीचा शॉ ला ओपनर फलंदाज म्हणून निवडलं आहे. याशिवाय एकदिवसीय सामन्यात मिडल ऑर्डरमध्ये मनीष पांडे वगळता हर्षाने जास्तीचे बदल केलेले नाहीत. श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनला कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते असं त्याने म्हटलंय. तर आयपीएलमधील पृथ्वीच्या दमदार कामगिरीनंतर त्याची एकदिवसीय आणि टी-20 मध्ये ओपनर फलंदाज म्हणून हर्षाने निवड केलेली आहे.
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय संघ
शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार
श्रीलंकेविरुद्ध टी 20 संघ
शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, राहुल तेवतिया, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, वरूण चक्रवर्ती, राहुल चाहर किंवा युजवेंद्र चहल
(India vs Srilanka Odi t20 series Harsha bhogle Playing Xi)
हे ही वाचा :
आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तारीख ठरली, पण BCCI पुढे ही सर्वांत मोठी अडचण!
‘मी विचारही केला नव्हता, मला हे दिवस बघायला मिळतील’, स्मृती मंधानाचा मोठा खुलासा