ICC World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची 15 एप्रिलला घोषणा

ICC World Cup 2019 मुंबई : आयसीसीच्या वन डे विश्वचषकासाठी येत्या 15 एप्रिलला भारतीय संघाची (Indian squad for Cricket World Cup 2019) घोषणा करण्यात येणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाला 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. […]

ICC World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची 15 एप्रिलला घोषणा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

ICC World Cup 2019 मुंबई : आयसीसीच्या वन डे विश्वचषकासाठी येत्या 15 एप्रिलला भारतीय संघाची (Indian squad for Cricket World Cup 2019) घोषणा करण्यात येणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाला 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.

सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीने 15 एप्रिलला भारतीय संघाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघनिवडीची शेवटची तारीख 23 एप्रिल होती, मात्र आता आठ दिवस आधीच म्हणजे 15 एप्रिलला भारताचा 15 सदस्यीय वर्ल्ड कप संघ जाहीर केला जाईल.  आतापर्यंत केवळ न्यूझीलंडनेच वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे.

दरम्यान, यंदापासून वर्ल्डकपमध्ये एक टीम सर्व संघांसोबत सामने खेळणार आहे. या फेरीनंतर पहिले चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. अंतिम सामना 14 जुलैला खेळवण्यात येईल.

दरम्यान, 1983 आणि 2011 चा विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियात कोणत्या 15 खेळाडूंना स्थान मिळणार याबाबत उत्सुकता आहे. भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंची नावं निश्चित झाली आहेत, मात्र चौथ्या क्रमांकावर कोण याबाबत संघव्यवस्थापनाला डोकेदुखी आहे.

चौथ्या क्रमांकावर कोण? दरम्यान, चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे. चौथ्या नंबरसाठी अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, के एल राहुल आणि विकेटकीपर ऋषभ पंत यांच्यात चुरस आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन कोणाला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

भारताचा संभाव्य संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, केएल राहुल आणि रिषभ पंत

46 दिवसात 48 सामने

दरम्यान, यंदा विश्वचषकाच्या 46 दिवसांत तब्बल 48 सामने होणार आहेत. गतविजेता ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 1 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध आहे.

भारतीय संघात कोणाकोणाला स्थान मिळू शकतं? तुमचा संघ कमेंट बॉक्समध्ये लिहा. 

दिनांकसामनाठिकाण
30 मेइंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका द ओव्हल
31 मे पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम
1 जून न्यूझीलंड वि. श्रीलंका सोफिया गार्डन्स, कार्डिफ
1 जून ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान ब्रिस्टल
2 जून बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका द ओव्हल
3 जून इंग्लंड वि. पाकिस्तान ट्रेंटब्रिज
4 जून अफगाणिस्तान वि. श्रीलंका सोफिया गार्डन्स, कार्डिफ
5 जून भारत वि. दक्षिण आफ्रिका रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन
5 जून बांगलादेश वि. न्यूझीलंड द ओव्हल
6 जून ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम
7 जून पाकिस्तान वि. श्रीलंका ब्रिस्टल
8 जून अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड टाँटन
9 जून भारत वि. ऑस्ट्रेलिया द ओव्हल
10 जून दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन
11 जून बांगलादेश वि. श्रीलंका ब्रिस्टल
12 जून ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान टाँटन
13 जून भारत वि. न्यूझीलंड ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम
14 जून इंग्लंड वि. वेस्ट इंडिज रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन
15 जून ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका द ओव्हल
16 जून भारत वि. पाकिस्तान ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
17 जून बांगलादेश वि. वेस्ट इंडिज टाँटन
18 जून इंग्लंड वि. अफगाणिस्तान ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
19 जून न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
20 जून ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम
21 जून इंग्लंड वि. श्रीलंका हेडिंग्ले, लीड्स
22 जून भारत वि. अफगाणिस्तान रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन
23 जून पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका लॉर्ड्स
24 जून अफगाणिस्तान वि. बांगलादेश रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन
25 जून इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स
26 जून न्यूझीलंड वि. पाकिस्तान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
27 जून भारत वि. वेस्ट इंडिज ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
28 जून दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका चेस्टर- ली-स्ट्रीट
29 जून पाकिस्तान वि. अफगाणिस्तान हेडिंग्ले, लीड्स
29 जून ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड लॉर्ड्स
30 जून भारत वि. इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
1 जुलै श्रीलंका वि. वेस्ट इंडिज चेस्टर-ली-स्ट्रीट
2 जुलै भारत वि. बांगलादेश एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
3 जुलै इंग्लंड वि. न्यूझीलंड चेस्टर-ली-स्ट्रीट
4 जुलै अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज हेडिंग्ले, लीड्स
5 जुलै बांगलादेश वि. पाकिस्तान लॉर्ड्स
6 जुलै भारत वि. श्रीलंका हेडिंग्ले, लीड्स
6 जुलै ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.