Video : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थाटात विजय, भारतीय महिला खेळाडूंचे तमीळ गाण्यावर ठुमके, डान्समध्ये कोण-कोण?
वेदा कृष्णमुर्तीसह (veda krishnamurthy) आणखी तीन महिला खेळाडूंनी तामिळ गाण्यावर जोरदार ठुमके लगावले. (India Women Cricket team Dance Video)
मुंबई : भारतीय महिला संघाने (India Women Cricket team) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दणदणीत पराभव केला. धडाकेबाज विजय साकारल्यानंतर त्याचं सेलिब्रेशनही धुमधडाक्यात व्हायला पाहिजे… मग काय वेदा कृष्णमुर्तीसह (veda krishnamurthy) आणखी तीन महिला खेळाडूंनी तमीळ गाण्यावर जोरदार ठुमके लगावले. (India Women Cricket team Dance Video)
डान्समध्ये कोण-कोण?
भारतीय महिला संघाची खेळाडू वेदा कृष्णमुर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सहकाऱ्यांच्या सोबतीने डान्स डान्स केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. वेदा, आकांक्षा कोहली (Akansha Kohli), व्हीआर वनिता (VR Vanitha) आणि ममता माबेन (Mamata Maben) या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसून येत आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
कोणत्या गाण्यावर ठुमके
तमीळ चित्रपट सृष्टीतला सुपरस्टार विजय (Vijay) याच्या ‘मास्टर’ चित्रपटातील वाथी कमिंग (Vathi Commimg) या गीतावर महिला खेळाडूंनी क्रिकेटशिवाय असलेलं डान्सचं कौशल्य संपूर्ण जगाला दाखवलं. डान्सरलाही लाजवतील अशा प्रकारे महिला खेळाडू या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसून येत आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार विजय
भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार विजयाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांमध्ये भारतीय संघाला जिंकण्यासाठी केवळ 158 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघाने 28.4 ओव्हरमध्ये केवळ एक विकेट गमावून हे आव्हान पूर्ण केलं. या विजयानंतर संघातील खेळाडूंनी डान्स करत आपला विजयाचा आनंद द्विगुणित केला.
हे ही वाचा :