मेलबर्न: भारतीय क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. (India vs Australia 2020)भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 27 नोव्हेंबरला होणार आहे. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिला एकदिवसीय सामना कधी झाला होता?. त्यात भारतानं विजय मिळवला की पराभव झाला होता. (India won first one day match against Australia )
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे मॅच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा इतिहास 88 वर्षांचा आहे. भारतानं एकदिवसीय सामने खेळण्यास 1974 मध्ये सुरुवात केली. भारतीय टीमची काही देशांविरुद्ध कामगिरी दमदार राहिली तर ऑस्ट्रेलियासारख्या देशानं भारतसमोर कायम आव्हान उभं केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिली मॅच 6 डिसेंबर 1980 रोजी झाली. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यांच्या तगड्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी ढेपाळली होती. (India won first one day match against Australia )
भारतानं 6 विकेट गमावून 111 धावा केल्या होत्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या संदीप पाटील यांनी सय्यद किरमानी यांच्यासाथीनं 92 धावांची भागिदारी रचली. पाटील यांनी 91.42 च्या सरासरीनं 4 चौकरासंह 64 धावा केल्या. सय्यद किरमानी यांनी देखील 48 धावा केल्या. भारतीय टीमनं 49 ओव्हरमध्ये 208 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळं ऑस्ट्रेलियाला 208 धावांचा पाठलाग करताना 42 ओव्हरमध्ये 142 धावा करता आल्या. भारतानं ऑस्ट्रेलियावर 66 धावांनी विजय मिळवला. (India won first one day match against Australia )
संदीप पाटील यांनी गोलंदाजीमध्ये देखील कमाल दाखवत 10 ओव्हरमध्ये 3.10 च्या सरासरीनं 31 धावा देत 1 विकेट घेतली. पाटील यांना बॅटिंग आणि बॉलिंगमधील चांगल्या कामगिरीमुळं मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला होता. (India won first one day match against Australia )
टीम इंडिया या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये प्रत्येकी 3 एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळणार आहे. यानंतर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. सुधारित संघामध्ये हिटमॅन रोहित शर्माची केवळ कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तर वरुण चक्रवर्थी दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी थंगारासू नटराजनला संधी देण्यात आली आहे. (India vs Australia 2020)
ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल
टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी
कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
K L Rahul | आयपीएलमध्ये झंझावात, आता के एल राहुलकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही मोठ्या अपेक्षा https://t.co/YnXxAQAvlG #KLRahul #TeamIndia #IPL #INDvsAUS #INDIATOURAUSTRALIA
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
संबंधित बातम्या :
IND vs AUS : कांगारुंविरुद्ध खेळण्यासाठी हिटमॅन सज्ज, टीम मॅनेजमेंटसह चाहते सुखावले
(India won first one day match against Australia )