‘मी वाट पाहतोय’, फोटो शेअर करत रोहित शर्माचा खास मेसेज!
दोन प्रतिस्पर्ध्यांदरम्यान रंगलेली उत्कंठावर्धक मॅच… दोन्ही संघादरम्यान जिंकण्याची चुरस… मैदानात प्रेक्षकांची ओसांडून वाहणारी गर्दी, आपापल्या प्लेअर्सला, संघांना प्रेक्षकांनी केलेलं चिअरअप, हे सगळं खेळाडू मिस करतायत. (Rohit Sharma Share photo With Fans Emotional Caption)
मुंबई : दोन प्रतिस्पर्ध्यांदरम्यान रंगलेली उत्कंठावर्धक मॅच… दोन्ही संघादरम्यान जिंकण्याची चुरस… मैदानात प्रेक्षकांची ओसांडून वाहणारी गर्दी, आपापल्या प्लेअर्सला, संघांना प्रेक्षकांनी केलेलं चिअरअप, हे सगळं खेळाडू मिस करतायत. जवळपास गेले वर्षभर मैदानावरील खेळ पाहायला प्रेक्षकांना परवानगी नाहीय. मैदानावर खेळाडूंना प्रेक्षकांविना खेळावं लागतंय. साहजिक प्रेक्षक नसल्याने खेळाडूंनाही थोडं चुकल्या सारखं वाटतंय. भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मादेखील (Rohit Sharma) वाट पाहतोय, भरगच्च भरलेल्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत शतक ठोकण्याची, आम्ही असं म्हणतोय कारण त्याने खास फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. (Indian Batsman Rohit Sharma Share photo With Fans Emotional Caption)
रोहितने शेअर केला खास फोटो
रोहित शर्माने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो शतक ठोकल्यानंतर हेल्मेट आणि बॅट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन करताना दिसून येत आहे. या फोटोत त्याने स्वत:ला ब्लर केलं आहे. फोटोमध्ये सारा फोकस हा प्रेक्षकांवरती आहे. फोटो तर सुंदर आहेत पण त्यापेक्षा सुंदर आहे रोहितने दिलेलं कॅप्शन… रोहितने दिलेल्या कॅप्शनवरुन समजून येतंय की खेळाडूंच्या मनात प्रेक्षकांची किती मोठी जागा असते…!
?.?.?.?.?.?.?, this is the reunion I am waiting for! pic.twitter.com/nGBhDA6yM4
— Rohit Sharma (@ImRo45) May 27, 2021
रोहितच्या कॅप्शनने जिंकली चाहत्यांची मनं
रोहितने खास फोटो शेअर करताना कॅप्शनही तेवढंच दिलखेचक दिलं आहे. रोहित कॅप्शनमध्ये म्हणतो, “फ्रेंड्स या रियूनियनचा मी वाट पाहतो आहे”. म्हणजेच प्रेक्षकांनी भरलेलं खचाखच स्टेडिअम, गर्दी, आरडाओरड, आपल्या खेळाडूंसाठीचं काळजापासून केलेलं चिअरअप…. या सगळ्या गोष्टी रोहित मिस करतोय, त्याचीच आठवण रोहितने एका फोटोमधून आणि दिलेल्या कॅप्शनमधून ताजी केली आहे.
खूप दिवसांपासून प्रेक्षकांविना ग्राऊंड सुनंसुनं
पाठीमागच्या एका वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलाय. जिकडं बघावं तिकडं कोरोनाने हैदोस मांडलाय. पण आता या परिस्थितीतून जग सावरताना दिसून येत आहे. तत्पूर्वी मागील दीड वर्ष स्टेडिअममध्ये प्रेक्षकांना एन्ट्री दिली गेली नाही. जर दिलीच तर अर्ध्या संख्येने…. इंग्लंड विरद्धच्या मालिकेवेळीही मैदान क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात एन्ट्री दिली गेली.
(Indian Batsman Rohit Sharma Share photo With Fans Emotional Caption)
हे ही वाचा :
इंग्लिश बॅट्समन माझा ‘हा’ खास प्लॅन समजूच शकत नव्हते, अक्षर पटेलचा खुलासा
‘नाद करा पण माझा कुठं…’ म्हणण्याची आर. अश्विनला संधी, WTC फायनलमध्ये विक्रम करणार?
Couple Goals : भारतीय क्रिकेटपटूचं पत्नीसोबत जबरदस्त वर्कआऊट, VIDEO पाहून चक्रावून जाल