मोहम्मद शमी वडिलांच्या आठवणीने व्याकूळ, इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट, म्हणाला…
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वडिलांच्या आठवणीने भावुक झालाय. | Indian Bowler Mohammad Shami Emotional post
नवी दिल्ली : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वडिलांच्या आठवणीने भावुक झालाय. शमीच्या वडिलांचं देहांत होऊन चार वर्ष होत आहेत. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन शमीने वडिलांची आठवण जागवली आहे. (Indian Bowler Mohammad Shami remembered His Father And Shared Emotional post on instagram)
शमीने वडिलांची आठवण जागवताना आपल्या इन्स्टाग्रामवर हळवी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये मी तुमची खूप आठवण करतो, कधी कधी तर तुमच्या आठवणीने माझ्या डोळ्यांत अश्रू येतात, असं त्याने म्हटलंय.
“बाबा तुम्ही जाऊन आज वर्ष पूर्ण होतायत. खरंच मी तुम्हाला एकदा पाहू शकलो असतो तर… परंतु मला हे माहितीय की हे अशक्य आहे…. माझ्या अश्रूंची किंमत तुम्हाला चांगलीच माहिती आहे… तुम्ही मला रडू देणार नाही, हे ही मला माहितीय… मी प्रार्थना करतो ईश्वराने मला शक्ती द्यावी जशी तुम्ही मला दिली…”, अशा भावनिक शब्दात त्याने वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिलाय.
मी तुमचा मुलगा आहे याचा मला कायम अभिमान आणि गर्व वाटायचा. पप्पा मला तुमची खूप आठवण येतीय… असं म्हणत भावविवश होऊन शमीने इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. शमीच्या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी त्याचं सांत्वन केलंय. शेकडो कमेन्ट्स करत त्याच्या चाहत्यांनी धीर दिलाय.
View this post on Instagram
शमीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून खेळला होता. अॅडलेड कसोटीत फलंदाजी करताना शमीला दुखापत झाल्यानंतर त्याने शेवटचे 3 कसोटी सामने खेळले नाहीत. 2013 मध्ये शमीने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामने खेळून आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती. मोहम्मद शमीने आतापर्यंत भारतासाठी 50 कसोटी, 79 एकदिवसीय सामने आणि 20 टी -20 सामने खेळले आहेत.
30 वर्षीय मोहम्मद शमीने 50 कसोटी 180 विकेट्स, 79 एकदिवसीय सामन्यात 148 विकेट्स आणि 20 टी -20 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. 5 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शमीचा भारतीय संघात समावेश होऊ शकला नाही.
हे ही वाचा :
IND vs ENG : पाहुणे आले…. कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाचं भारतात आगमन
ICC Award : अश्विन आणि ऋषभ पंत सर्वश्रेष्ठ खेळाडूंच्या स्पर्धेत
Tim Paine | भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव, आता ऑस्ट्रेलियाच्या टीम पेनचं कर्णधारपदच धोक्यात!