IND vs SA : टीम इंडियाची गोलंदाजी अजूनही चिंतेचा विषय, विश्वचषक जिंकणार का?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी ही मालिक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या मालिकेत सगळ्यांचं लक्ष गोलंदाजीकडे असणार आहे.
आशिया चषकापासून (Asia Cup 2022) टीम इंडियाचे गोलंदाज खराब कामगिरी करताना दिसत आहे. ऑस्ट्रलियाविरुद्धची (Australia) मालिका जरी त्यांनी जिंकली असली तरी त्यांना अद्याप यश मिळालेलं नाही. त्यामुळे गोलंदाजी हा विषय टीम इंडियासाठी (Team India) चिंतेचा विषय आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत फलंदाजी चांगली झाल्याने टीम इंडियाला मालिका जिंकता आली.
जसप्रीम बुमराह आणि हर्षल पटेल यांना टीममध्ये संधी देण्यात आली असली, तरी सुद्धा दोघांच्या गोलंदाजीवरती अनेक धावा गेल्या आहेत. त्यामुळे नेमकं काय करायला हवं असा प्रश्न टीम इंडियासमोर आहे.
आशिया चषकात महत्त्वाच्या सामन्यात ज्यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई झाली, त्यावेळी निवड समितीवर चाहत्यांनी जोरदार टीका केली. कारण चांगले खेळाडू घरी असताना यांची निवड कोणी केली असा संतप्त सवाल सुद्धा चाहत्यांनी उपस्थित केला होता.
टीम इंडियाकडे फलंदाजी मजबूत असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. परंतु गोलंदाजीमुळे पदरी पराभव पडत असल्याचं चित्र आहे. आज टीम इंडियाची आफ्रिका टीमसोबत मालिका सुरु होत आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी ही मालिक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या मालिकेत सगळ्यांचं लक्ष गोलंदाजीकडे असणार आहे.
T20 मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मो. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह…
T20 मालिकेसाठी आफ्रिका टीम
दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्सिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले शॉम्सी, रिले शॉम्सी, ट्रिस्टन स्टब्स, यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन, ए. फेलुकायो.