घरी येताना चांगले कपडे घालून ये, बायकोच्या प्रश्नावर अजिंक्य क्लीन बोल्ड, म्हणाला….

अजिंक्यच्या स्वागताला त्याचे कुटुंबीय, मित्र परिवार तसंच माटुंग्याच्या सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते.

घरी येताना चांगले कपडे घालून ये, बायकोच्या प्रश्नावर अजिंक्य क्लीन बोल्ड, म्हणाला....
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 12:20 PM

मुंबई : ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत जाऊन चारी मुंड्या चीत केलेल्या भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचं आज मुंबईतल्या घरी जंगी स्वागत झालं. त्याच्या स्वागताला त्याचे कुटुंबीय, मित्र परिवार तसंच माटुंग्याच्या सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते. यावेळी अजिंक्यच्या कामगिरीची अभिमान, उत्साह तिथे उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अजिंक्यला हे स्वागत अनपेक्षित होतं. त्यामुळे स्वागतानंतर त्याची प्रतिक्रिया खास बोलकी होती. (Indian Captain Ajinkya Rahane And His Wife Radhika Rahane Diaologue)

जंगी स्वागतानंतर अजिंक्य भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. कुटुंबीय, मित्र परिवार, आप्तेष्ट, सोसायटीतील रहिवासी यांच्या स्वागताला उत्तर देताना अजिंक्य म्हणाला, “आज मला खरंच खूप आनंद होतोय… माझ्यासाठी नक्कीच हा क्षण आनंददायी आहे. आमच्या या कामगिरीमागे सगळ्या देशवासियांचा हात आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं…”

यावेळी अजिंक्यने खास प्रायव्हेट सिक्रेटही उघड करुन सांगितलं. “ज्यावेळी अजिंक्यचं विमान मुंबईत उतरणार असं ठरलं त्यावेळी त्याची पत्नी राधिकाने त्याला फोन करुन घरी येताना चांगली कपडे घालून घे, असं सांगितलं. तिच्या फोननंतर मला काही कळेना की चांगली कपडे घातल्याने काय फरक पडेल? तिला मी जेव्हा यावर विचारलं त्यावर तीने मला उत्तर दिलं की मुलगी आर्याला बरं वाटेल. ती आनंदी होईल… खूश होईल…”

अजिंक्यचं केक कापून स्वागत

कांगारुंना पराभूत केल्याचा आनंद अजिंक्यच्या चेहऱ्यावर यावेळी स्पष्ट दिसत होता. मुंबईतील घरी परतलेल्या अजिंक्यचं त्याच्या कुटुंबीयांनी केक कापून स्वागत केलं. मुंबई विमानतळावर भारतीय क्रिकेट संघातील पाच खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अजिंक्य रहाणेच्या घराबाहेरही ढोलताशाच्या गजरात चाहत्यांनी स्वागत केलं. तर रहाणे कुटुंबाने केक कापून विजयोत्सव साजरा केला. पत्नी राधिका, चिमुरडी आर्याही बाबाच्या यशाने भारावून गेल्या.

माटुंग्यातील सोसायटीत ढोल ताशांचा गजर

अजिंक्य रहाणे सकाळी 10 च्या सुमारास माटुंग्यातील आपल्या घराजवळ पोहोचला. यावेळी त्याच्या स्वागताला जमलेले लोक पाहून त्याला अनपेक्षित धक्का बसला. क्रिकेट रसिकांनी त्याच्या स्वागताला एकच गर्दी केली होती. ‘थ्री चिअर्स फॉर अजिंक्य’च्या  घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.

अजिंक्यच्या गावातही जल्लोष

अजिंक्य रहाणेच्या गावात जल्लोष साजरा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापुरी या अजिंक्य रहाणेच्या गावात गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचल्याने, गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. अजिंक्य रहाणेच्या घरी फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं. इतकंच नाही तर पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.

(Indian Captain Ajinkya Rahane And His Wife Radhika Rahane Diaologue)

हे ही वाचा

टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, कारण अजिंक्य रहाणेच्या मागे ‘पवार ब्रँड’!

Ajinkya Rahane | लेक खांद्यावर, बायको बाजूला, घरी परतताच अजिंक्य म्हणाला

Ajinkya Rahane VIDEO | ऑस्ट्रेलिया गाजवून टीम इंडिया मायदेशी, अजिंक्य रहाणेचं केक कापून स्वागत

ब्रिस्बेनपासून चंदनापुरीपर्यंत रहाणेंचाच गुलाल, कसोटी मालिका जिंकली, ग्रामपंचायत निवडणुकीतही रहाणे पॅनेल विजयी!

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.