VIDEO | पदार्पणातील सामन्यात बॅटिंगने इंग्लंडला घाम फोडणाऱ्या इशानचं विराटकडून तोंडभरून कौतूक, म्हणाला…
इशनाच्या याच खेळीचे विराटनं तोंडभरुन कौतूक केलंय. विराटने इशानला निर्भय होऊन खेळणारा खेळाडू म्हटलंय. (virat kohli ishan kishan)
अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या टी-20 सामन्यात (india vs england 2nd t 20) 7 गडी राखत दणदणीत विजय मिळवला. यामध्ये टी- 20 सामन्यात डेब्यू करणाऱ्या इशान किशनने ( Ishan Kishan) धडाकेबाज खेळी केली. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात तब्बल 56 धावा केल्या. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि इशान यांनी धावपट्टीवर आपली पकड कायम ठेवत सामना खिशात घातला. इशनाच्या याच खेळीचे विराटनं तोंडभरुन कौतूक केलंय. विराटने इशानला निर्भय होऊन खेळणारा खेळाडू म्हटलंय. (Indian captain Virat Kohli appreciated Ishan Kishan on his inning in first t 20 match)
विराट कोहली काय म्हणाला?
टीम इंडियाने इंग्लंडसोबतचा दुसरा टी-20 सामना सहज जिंकला. या खेळात इशान किशनने जोरदार फलंदाजी केली. इशानच्या षटकार आणि चौकारांच्या जोरावर इंग्लंडने 165 धावांचे दिलेले आव्हान भारताने लिलया पेलले. सामन्यादरम्यान विराट आणि इशानने धावपट्टीवर चांगलाच जम बसवला आणि दोघांनी मिळून तब्बल 94 धावांची खेळी केली. यावेळी विराटने इशानच्या खेळाचं तोंडभरून कौतूक केलंय. विराटने इशानला एक बिनधास्त आणि निर्भयपणे खेळणारा खेळाडू म्हटलंय. ” टी-20 सारख्या खेळामध्ये इशानने त्याच्या पहिल्याच सान्यात आंतराष्ट्रीय पातळीवरच्या गोलंदाजांना चांगलंच चोपलं. तो ज्या पद्धतीने फास्ट गोलंदाजांना सामोरे जात होता त्यावरुन त्याची खेळावर असलेली पकड दिसत होती. त्याच्या वागण्यावरुन तो एक निर्भय खेळाडू असल्याचं दिसत होतं. इशान त्याच्या जागेपासून ढळला नाही. आम्ही सामन्यादरम्यान चर्चा करायचो. खेळताना त्याने संपूर्ण खेळ चांगल्या पद्धतीने समजून घेतला. सान्यादरम्यान त्याने काही मोठे फटके मारले. पण मोठे फटके मारताना तो बेपरवाईने वागत नव्हता. इशानसारख्या तरुण खेळाडूमध्ये मला खूप काही गोष्टी दिसल्या. इशान आज उत्तम पद्धतीने खेळ खळला,” असं विराटने इशानबद्दल प्रतिक्रिया दिली.
विराटने इशानचे तोंडभरुन कोतूक केले, पाहा व्हिडीओ
? “He is a fearless character & should continue to back his instincts.”
High praise for T20I debutant @ishankishan51 from #TeamIndia captain @imVkohli ????@Paytm #INDvENG pic.twitter.com/88LNmrAZsp
— BCCI (@BCCI) March 14, 2021
गब्बरच्या टेन्शनमध्ये वाढ
इशानने एकूण 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह शानदार 56 धावांची खेळी केली. इशान टी 20 पदार्पणात अर्धशतकी कामगिरी करणारा दुसरा भारतीय ठरला. इशानने केलेल्या कामगिरीमुळे शिखरचे संघातील सलामीची जागा धोक्यात आली आहे. इशानने या खेळीसह शिखरला आव्हान दिले आहे. त्यामुळे शिखरसमोर संघातील स्थान कायम राखण्यासाठी चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे. शिखरला पहिल्या टी 20 सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र शिखरने निराशा केली. शिखरने पहिल्या मॅचमध्ये 12 चेंडूत 4 धावा केल्या होत्या.
दरम्यान, या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 165 धावांचे आव्हान ठेवले. धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर के.एल. राहुल शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाची 0-1 अशी स्थिती झाली. त्यानंतर विराट मैदानात आला. इशान आणि विराटने धावफलक धावता ठेवला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. या दरम्यान इशानने सिक्सर खेचत पहिलवहिलं अर्धशतक झळकावलं. इशानने 28 चेंडूत ही कामगिरी केली. मात्र त्यानंतर इशान 56 धावांवर बाद झाला. यामध्ये इशानने 5 चौकार आणि 4 सिक्स खेचले. इशानच्या या शानदार खेळीचे भारतीय खेळाडूंकडून चांगलंच कौतूक होत आहे.
इतर बातम्या :
Ishan Kishan | किशनच्या खेळीने ‘गब्बरचं’ टेन्शन वाढलं, संघातील स्थान कायम राखण्यासाठी शिखरसमोर इशानचं आव्हान
Video | आयपीएल गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशनचं टी 20 पदार्पण
(Indian captain Virat Kohli appreciated Ishan Kishan on his inning in first t 20 match)