विराटला अगोदरच अंदाज आला होता, कृष्णा ‘प्रसिद्ध’ होणार आणि झालंही तसंच…!

एका पत्रकार परिदषेत विराटला टी 20 वर्ल्ड कपविषयी विचारलं गेलं त्यावेळी विराटने प्रसिद्ध कृष्णाचं नाव सरप्राईज पॅकेज म्हणून घेतलं. Virat kohli prasidh krishna

विराटला अगोदरच अंदाज आला होता, कृष्णा 'प्रसिद्ध' होणार आणि झालंही तसंच...!
krishna prasidh
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 10:37 AM

पुणे :  मॅच होती 2020 सालची… भारत आणि श्रीलंका (india vs srilanka) आमने सामने होते… म्हणजे कोरोना व्हायरसने भारतात धुमाकूळ घालण्याच्याअगोदरची… टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर होता. अशातच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat kohli) एक प्रश्न विचारला गेला… प्रश्न होता टी-20 वर्ल्ड कपविषयीचा… पण उत्तराच्या केंद्रस्थानी होता कर्नाटकचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा…  (Prasidh krishna) हा तोच प्रसिद्ध कृष्णा ज्याने इंग्लंडच्या विरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या मॅचमध्ये चार विकेट्स घेऊन इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले. (indian Captain Virat kohli Guess Bowler Prasidh krishna Bowling performance T20)

प्रसिद्ध कृष्णा म्हणजे सरप्राईज पॅकेज

विराट कोहलीच्या नजरेस प्रसिद्ध कृष्णा मागच्याच वर्षी पडला, ज्यावेळी तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. एका पत्रकार परिदषेत विराटला टी 20 वर्ल्ड कपविषयी विचारलं गेलं त्यावेळी विराटने प्रसिद्ध कृष्णाचं नाव सरप्राईज पॅकेज म्हणून घेतलं.

प्रसिद्ध कृष्णाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलीय. तो सरप्राईडज पॅकेज ठरू शकतो, असा अंदाज विराटने बांधला होता. काल इंग्लंड विरुद्ध प्रसिद्धने एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात पुनरागमन केलं. आणि पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या चार धडाकेबाज फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

पदार्पणाच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाची धमाकेदार कामगिरी

प्रसिद्ध कृष्णाने आपल्या पदार्पणातील सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. प्रसिद्धने इंग्लंडच्या 4 फलंदाजांना निर्णायक क्षणी आऊट केलं. प्रसिद्धने जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स आणि टॉम करनला आऊट केलं.

भारताची डोकेदुखी ठरत असलेली सलामी भागीदारी फोडली, भारताला लय सापडली

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या इंग्लंडची झोकात सुरुवात झाली होती. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोने 135 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. टीम इंडिया बॅक फुटवर होती. भारताला विकेटची गरज होती. अशा निर्णायक क्षणी प्रसिद्धने आपल्या गोलंदाजीने जेसन रॉयला सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं. यासह प्रसिद्धने पहिली विकेटही घेतली. तसेच ही जोडीही फोडली.

पुढे भारतीय संघाला विकेट्सची गरज असताना प्रसिद्ध कृष्णा धावून आला. मोक्याच्या क्षणी त्याने बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्सला आऊट करत भारताचा विजय आणि सुखर केला. (indian Captain Virat kohli Guess Bowler prasidh krishna Bowling performance T20)

हे ही वाचा :

कोहली जडेजासोबत वर्ल्डकप जिंकला, मुंबईकडून सर्वाधिक सिक्सर, ‘डावखुरा धोनी’ म्हणून ओळख पण 3 मॅचमध्ये करिअर संपलं…

IPL 2021 : चेन्नईला बाय बाय करत महेंद्रसिंग धोनी आता मुंबईच्या दिशेने!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.