मुंबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final 2021) आता दिवसेंदिवस जवळ येऊ लागलेली आहे, तशी हालचाल देखील वाढू लागली आहे, कुणाचा पगडा भारी राहणार? कुणाची तयारी कशी सुरु आहे? इथपासून ते वर्ल्ड चॅम्पियनशिपचा फायनल सामना कोण जिंकणार? इथपर्यंत चर्चा सुरु आहेत. दिवसेंदिवस आता खेळाडूंची विविध वक्तव्यही समोर येऊ लागले आहेत. दोन्ही संघांचा बोलिंग अटॅक कसा आहे, फलंदाजीमध्ये कोण चमकणार? यावरुनही चर्चा रंगते आहे. फायनल सामन्यात कोण कमाल करणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीची (Virat kohi) इंग्लंडमधील कामगिरी कशी आहे? याच्यावर आता आपण एक नजर टाकूया… (Indian Captain Virat Kohli perFormance report In England Wtc Final 2021 India vs England)
विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्यात पहिल्यांदा न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना विराटच्या नेतृत्वात खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीची बॅट बोलणार का? भारत हा सामना जिंकणार का? या सगळ्या चर्चा आता वाराच्या वेगाने होतायत. पाहूयात इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीची बॅट आतापर्यंत तळपलीये…
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 2014 साली पहिला इंग्लंड दौरा केला होता. हा दौरा विराट कोहली आता विसरायच्या मूडमध्ये असेल. कारण हा दौरा विराटसाठी अत्यंत फ्लॉप ठरला होता. विराट कोहलीने फलंदाजीने भारतीय क्रिकेट रसिकांना नाराज केलं होतं. अँडरसनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड टीमने विराट कोहली आणि भारतीय फलंदाजांना जेरीस आणलं होतं. विराट कोहलीने 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात 10 डावांमध्ये केवळ 134 रन्स केले होते आणि सरासरी होती ती फक्त 13.4 म्हणजेच विराटचा 2014 चा इंग्लंड दौरा किती फ्लॉप ठरला, याचा अंदाज येईल.
इंग्लंडच्या मातीत विराटनं दुसऱ्यांदा 2018 साली दौरा केला. पहिला दौरा त्याला खूपच बेकार गेला होता. मात्र दुसरा दौऱ्यात त्याने कमाल करुन दाखवली. विराटनं दुसऱ्या दौर्यात दहा डावांमध्ये तब्बल 593 रन्स केले. जवळपास 60 च्या सरासरीने त्याने धावा काढल्या होत्या. या दौर्यात विराट कोहलीने 2 शतक आणि 5 अर्धशतके ठोकली. टीमच्या पूर्ण रन्समध्ये विराट कोहलीने एकट्याने 24.2 टक्के इतके रन्स केले. यामध्ये पाच वेळा त्यानं टीमकडून सर्वाधिक स्कोअर केला.
विराट कोहली आता तिसऱ्यांदा इंग्लंड दौऱ्यावर जातोय. पहिल्यांदा न्यूझीलंड आणि नंतर त्याला इंग्लंडशी भिडायचं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट कोहली जवळ आयसीसीचं पहिलं करंडक जिंकण्याची नामी संधी आहे. या संधीचा विराट फायदा उठवतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(Indian Captain Virat Kohli perFormance report In England Wtc Final 2021 India vs England)
हे ही वाचा :
IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा
IPL 2021 चे उर्वरित सामने UAE मध्ये, 29 मे रोजी BCCI घोषणा करणार?