ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहली खेळाडूंना काय सांगतो? शुभमन गिलने सांगितली ‘राज की बात!’
भारतीय संघाचा ओपनर बॅट्समन शुभमन गिलने (Shubman Gill) कर्णधार विराट कोहलीबाबतच्या (Virat kohli) काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. (Virat Kohl Shubman Gill)
मुंबई : भारतीय संघाचा ओपनर बॅट्समन शुभमन गिलने (Shubman Gill) कर्णधार विराट कोहलीबाबतच्या (Virat kohli) काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. कर्णधार कोहली ड्रेसिंग रुममध्ये नवोदित खेळाडूंना काय सांगतो? कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करतो? अशा विषयांवर शुभमन गिल व्यक्त झाला आहे. विराट भैया नेहमीच भयमुक्त होऊन खेळायला सगळ्या खेळाडूंना प्रेरित करतो. तो नेहमी सगळ्या नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करतो, असं शुभमन गिल यांने सांगितलं. (Indian Cricket Team What does Virat Kohli tell the players in the dressing room? Shubman Gill told the secret)
शुभमन गिल काय म्हणाला?
तुम्ही जसा नैसर्गिक खेळ करता, तसाच खेळ प्रत्येक मॅचमध्येकरायला हवा. तुम्ही गोलंदाजांना अजिबात घाबरायला नको. ज्या प्रकारे तुमची क्षमता आहे त्या क्षमतेनुसार तुम्ही तुमचा खेळ केला पाहिजे. ज्यावेळी माझं खेळावर मन लागत नाही. त्यावेळेस मी कोहलीशी जाऊन बातचीत करतो. तो नेहमी मला मोटिव्हेट करतो आणि चांगला खेळ करण्यास प्रवृत्त करतो, असं शुभम गिलने सांगितलं.
कोहलीच्या सदाबहार खेळानं आणि आक्रमक अंदाजानं आम्हाला नेहमीच त्याच्याकडून प्रेरणा मिळते आणि मदतही मिळते. तो नेहमी इतर खेळाडूंना चांगलं खेळण्यासाठी सल्ले देत असतो आणि त्याच्या सल्ल्यांचा फायदाही होत असतो. कोहली ड्रेसिंग रुममध्ये वेळोवेळी इतर खेळाडूंशी बोलत असतो, त्यांच्या खेळाविषयी चर्चा करत असतो, असंही शुभमन गिल यांने सांगितलं.
शुभमन गिलची आक्रमक खेळाडू म्हणून ओळख
शुभमन गिलची एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळख आहे. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. कोलकात्याकडून खेळाताना त्याने अनेक धमाकेदार केळी साकारल्या आहेत. त्याने आपलं खेळाने त्याची निवडकर्त्यांना दखल घ्यायल लावलीय.
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर
भारतीय संघ काहीच दिवसांत इंग्लंड दौऱ्यावर जातोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध भारताला खेळायचा आहे आणि त्यानंतर इंग्लंड विरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताला खेळायची आहे. याच भारतीय संघात शुभमनचा समावेश झालेला आहे. भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी 3 जून रोजी रवाना होणार आहे.
(Indian Cricket Team What does Virat Kohli tell the players in the dressing room? Shubman Gill told the secret)
हे ही वाचा :