India Tour Australia | टीम इंडियाच्या जर्सीवर नवा ब्रँड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नव्या स्पॉन्सरसह मैदानात
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय क्रिकेट टीमचा किट स्पॉन्सर बदलला जाणार आहे. NIKE ने कोरोनाचे कारण देत करार रकमेत कपात करण्याची मागणी केली होती. ( Indian Cricket team will get new kit sponsor from Australia Tour )
नवी दिल्ली : कोरोना संसर्गानंतर भारतीय क्रिकेट टीम पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापासून भारतीय क्रिकेट टीमचा किट स्पॉन्सर बदलला जाणार आहे. NIKE च्या जागेवर MPL किट स्पॉन्सर असेल. MPL आणि BCCI मध्ये तीन आगामी तीन वर्षांचा करार झाल्याची माहिती आहे. ( Indian Cricket team will get new kit sponsor from Australia Tour )
MPL नवा किट स्पॉन्सर
मोबाईल प्रीमिअर लीग (MPL) हे मोबाईल गेमिंग अॅप आहे. MPL आणि BCCI मध्ये आगामी 3 वर्षांसाठी करार झाल्याची माहिती आहे. नोव्हेंबर 2020 पासून MPL भारतीय संघाची किट स्पॉन्सर असणार आहे. प्रत्येक सामन्याला 65 लाख रुपये असा करार बीसीसीआय आणि एमपीएलमध्ये झाला आहे. BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. 65 लाख एका सामन्याचे असे मिळून वार्षिक 3 कोटी रुपयांचा करार झाला आहे.
NIKE कडून करार कपातीची मागणी
भारतीय टीमचा किट स्पॉन्सर असलेल्या NIKE कडून कोरोना आणि लॉकडाऊनचे कारण देत करार रकमेत कपातीची मागणी केली होती. NIKE आणि बीसीसीआय यांच्यामध्ये तोडगा निघाला नाही, अखेर नवा किट स्पॉन्सर निवडण्यात आला आहे.
कोरोना नंतरचा भारताचा पहिला दौरा
कोरोना विषाणू महामारीनंतर भारतीय संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहे. 27 नोव्हेंबरला पहिला एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्रांऊडवर होणार आहे. भारत या दौऱ्यामध्ये एकदिवसीय सामन्यांसह टी-20 आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघाचा हा मोठा दौरा आहे.
आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत असलेला लोकेश राहुलला वनडे आणि टी 20 सीरिजसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल
टी-20 सीरिज
टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती
टी-20 मालिका पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी
IPL 2020 Playoffs : प्ले ऑफच्या 3 जागांसाठी 4 संघात रेस, तिकीट कुणाला?#IPL2020 #IPLplayoffs #RCB #KKR #DC #SRH #Mumbai #MumbaiIndians https://t.co/Jk4YMji2NU
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2020
संबंधित बातम्या :
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा; पाहा संपूर्ण शेड्यूल
India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर
( Indian Cricket team will get new kit sponsor from Australia Tour )