2 षटकात 33 धावा दिल्या, टीम इंडियातून बाहेरचा रस्ता, अष्टपैलू खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानात हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात पराभव झाल्यामुळे टीम इंडिया (Team India) स्पर्धेतून बाहेर पडली.

2 षटकात 33 धावा दिल्या, टीम इंडियातून बाहेरचा रस्ता, अष्टपैलू खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
Manoj Prabhakar
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 1:42 PM

मुंबई : क्रिकेट वर्ल्डकप 1996 (1996 Cricket World Cup) ज्यांनी पाहिला असेल, त्यांना माजी क्रिकेपटू विनोद कांबळीचे (Vinod Kambli) अश्रू आठवत असतील. श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानात हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात पराभव झाल्यामुळे टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडली. टीम इंडियाला केवळ पराभवाचा धक्का बसला नव्हता, तर भारताला आणखी एक झटका बसला होता. तो होता भारताच्या अष्टपैलू क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा. तो अष्टपैलू खेळाडू म्हणजे मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar) होय. मनोज प्रभाकर यांना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याच वेदनेतून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आजच्याच दिवशी 1996 मध्ये मनोज प्रभाकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले होते.

खरंतर या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 271 धावा केल्या होत्या. त्यावेळी ही धावसंख्या आव्हानात्मक होती. सचिन तेंडुलकरने 137 चेंडूत 137 धावा ठोकल्या होत्या. यामध्ये 8 चौकार आणि 5 दणदणीत षटकारांचा समावेश होता. मात्र सचिन धावबाद झाला होता. त्याशिवाय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनेने 80 चेंडूत 72 आणि संजय मांजरेकरने 32 धावांचं योगदान दिलं होतं.

श्रीलंकेकडून रवींद्र पुष्पकुमारा आणि कुमार धर्मसेना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली होती.

मनोज प्रभाकर यांचा शेवटचा सामना

भारताच्या 271 धावांचं आव्हान घेऊन श्रीलंका मैदानात उतरली. सलामीवीर सनथ जयसूर्याने घणाघाती फलंदाजी केली. त्यामुळे श्रीलंकेने हा सामना 48.4 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. जयसूर्याने 76 चेंडूत 79 धावा केल्या. हसन तिलकरत्नेने 98 चेंडूत 70 धावा ठोकल्या, तर कर्णधार अर्जुन रणतुंगाने 43 धावांची भर घातली.

भारतीय गोलंदाज मनोज प्रभाकर हे या सामन्यात महागडे ठरले. त्यांनी केवळ 4 षटकात तब्बल 47 धावा दिल्या. त्यापैकी 33 धावा तर अवघ्या 2 षटकात ठोकल्या. यानंतर मनोज प्रभाकर यांना टीममधून बाहेर करण्यात आलं. त्यामुळे निराश झालेल्या प्रभाकर यांनी तातडीने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे तो सामना मनोज प्रभाकर यांच्यासाठी शेवटचा ठरला होता.

मनोज प्रभाकर यांची कारकीर्द

मनोज प्रभाकर यांनी टीम इंडियाकडून 39 सामने खेळले. त्यामध्ये त्यांनी 32.65 च्या सरासरीने 1600 धावा देत, 96 विकेट्स घेतल्या. तर भारताकडून खेळलेल्या 130 वन डे सामन्यात त्यांनी 1858 धावा देत, 157 फलंदाज बाद केले. प्रभाकर यांच्या नावावर 1 शतक आणि 9 अर्धशतकं, तर वन डेमध्ये 2 शतकं आणि 11 अर्धशतकं जमा आहेत.

संबंधित बातम्या 

On This Day | 116 धावांचा यशस्वी बचाव, जाडेजाच्या फिरकीची धमाल, विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा U 19 वर्ल्ड कप विजय

Vijay Hazare Trophy | सेहवागच्या पुतण्याचा धमाका, 9 व्या नंबरवर येऊन वादळी खेळी, तरीही टीमची बेईज्जती 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.