क्रिकेटर्सचा बोलविता धनी कोण? सगळ्यांची भाषा सारखीच कशी? सोशल मीडियात जोरदार चर्चा

भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंनी शेतकरी आंदोलनावरुन एकापाठोपाठ एक ट्विट केले. खेळाडूंनी लागोपाठ ट्विट केल्याने त्याची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. | Indian Cricketers back To back tweet over Delhi Farmer Protest

क्रिकेटर्सचा बोलविता धनी कोण? सगळ्यांची भाषा सारखीच कशी? सोशल मीडियात जोरदार चर्चा
Team india Cricketers
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 3:22 PM

मुंबई : राजधानी नवी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या मागण्यासाठी बळीराजा ठाण मांडून बसलाय. या दोन महिन्यांच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. आता आंदोलन निर्णायक वळणावर आलेलं असताना बुधवारी परदेशी अभिनेत्रींनी शेतकऱ्यांची बाजू घेत मोदी सरकारवर टीका करणारे ट्विट केले. त्यानंतर काल दिवसभर आणि आज (बुधवार आणि गुरुवारी)  भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंनी शेतकरी आंदोलनावरुन एकापाठोपाठ एक ट्विट केले. खेळाडूंनी लागोपाठ ट्विट केल्याने त्याची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. तसंच त्यांच्या ट्विटची भाषा, आशय आणि हॅशटॅग एकच असल्याने या क्रिकेटर्सचा बोलविता धनी कोण? सगळ्यांची भाषा सारखीच कशी?, या चर्चेला ऊत आलाय. पाहूयात कोणकोणत्या क्रिकेटर्सनी शेतकरी आंदोलनावर ट्विट केलेत.  (Indian Cricketers back To back tweet over Delhi Farmer Protest)

सचिन तेंडुलकरचं ट्विट

भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.

Sachin Tendulkar

Sachin Tendulkar

विराट कोहलीचं ट्विट

मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकजूट राहिले पाहिजे. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व पक्षांमध्ये शांततेचा तोडगा निघेल जेणेकरून शांतता राहील आणि सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतील, असं ट्विट रोहित शर्माने केलं आहे.

virat Kohli

virat Kohli

रोहित शर्माचं ट्विट

भारत हा एकसंध असून आपण सर्वजण मिळून समस्येवर मार्ग काढणं ही काळाची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. देशाच्या भल्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील, असं ट्विट रोहित शर्मा याने केलंय.

Rohit Sharma

Rohit Sharma

सुरेश रैनाचं ट्विट

देशात काही समस्या असतात. ज्या समस्यांची उत्तरे आज उद्या मिळू शकतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की बाहेरच्यांनी हस्तक्षेप करावा, अशा शब्दात रैनाने परदेशी सेलिब्रेटींना फटकारलं आहे.

Suresh raina

Suresh raina

अनिल कुंबळेचं ट्विट

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांतपणे सोडवू शकतो आहे, असं मत मांडत अप्रत्यक्षपणे कुंबळेने मोदी विरोधकांवर निशाणा साधलाय.

Anil Kumble

Anil Kumble

ही ट्विटर मालिका सुरु केली ती रिहाना कोण आणि ती ट्विटमध्ये काय म्हणाली…?

मागच्या दोन महिन्यांपासून देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. या सगळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेताकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं आहे. या ट्वीटनंतर रिहाना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

world famous popstar model Rihanna Modi government

मागच्या दोन महिन्यांपासून देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. या सगळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेताकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे.

रिहानाचं पूर्ण नाव रोबीन रिहाना फेंटी आहे. तिचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 ला झाला होता. ती एक बारबेडिअन पॉपस्टार, मॉडल आणि प्रसिद्ध व्यावसायिकसुद्धा आहे. बारबाडोसमध्ये जन्मलेल्या, रिहानाला वयाच्या 16 व्या वर्षी रेकॉर्डिंग करिअरसाठी रेकॉर्ड निर्माता इव्हान रॉजर्सने अमेरिकेत बोलावलं होतं. 2005 मध्ये, रिहानाने तिचा पहिला स्टुडिओ अल्बम, म्युझिक ऑफ द सन प्रसिद्ध केला होता. जो बिलबोर्ड 200 चार्टच्या पहिल्या दहामध्ये पोहोचला. एका वर्षापेक्षाही कमी वेळात रिहानाने तिचा दुसरा स्टुडिओ अल्बम, ए गर्ल लाइक मी (2006) प्रसिद्ध केला. तिच्या या अल्बम्सला नागरिकांनी प्रचंड पसंती दिली. हा बिलबोर्ड अल्बमवरील चार्टच्या पहिल्या पाचमध्ये पोहोचला होता. या आंतरराष्ट्रीय पॉपस्टारच्या चाहत्यांची भारतातही कमी नाही. जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकारात 32 वर्षीय रिहानाचं नाव आहे.

अभिनेत्री कंगना रनौतची शेतकरी आंदोलनाबद्दलची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुचं आहे. कंगना रणौतच्या निशाण्यावर सध्या क्रिकेटर्स आले आहेत. कंगनानं क्रिकेटपटू रोहित शर्माच्या ट्विटरवरुन क्रिकेट खेळाडूंवर निशाणा साधला आहे. “हे सर्व क्रिकेट खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?”, अशी टीका केलीय. शेतकरी त्यांच्याच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना विरोध का करत आहेत?, असा सवाल कंगना रणौतनं विचारला आहे.

Rohit Sharma_ kangana ranaut

रोहित शर्मा कंगना रणौत

(Indian Cricketers back To back tweet over Delhi Farmer Protest)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.