भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला कोरोनाची लागण
प्रसिद्ध फुटबॉलपटू (sunil chhetri tested corona positive) सुनील छेत्रीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे.
मुंबई : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला कोरोनाची लागण झाली आहे. सुनीलने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “मी ठणठणीत आहे. मला कोणताच त्रास नाही. मी लवकरच मैदानात परतेन”, असा आशावाद सुनीलने ट्विटद्वारे व्यक्त केला आहे. तसेच सुनीलने नागरिकांना कोरोनाच्या नियमांचं पालन करा, असं आवाहनही ट्विटद्वारे केलं आहे. सुनीलने काही दिवसांपूर्वी गोव्यात इंडियन सुपर लीग स्पर्धेत खेळला होता. या स्पर्धेत बंगळुरु एफसीचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्ठात आलं होतं. (indian football captain sunil chhetri tested corona positive)
In a not-so-happy update, I've tested positive for COVID-19. In better news, I feel fine as I continue my recovery from the virus and should be back on a football pitch soon. No better time to keep reminding everyone to continue taking all the safety precautions always.
— Sunil Chhetri (@chetrisunil11) March 11, 2021
छेत्रीसाठी ISL-7 निराशाजनक
प्रसिद्ध क्लब बंगळुरु एफसीचा कर्णधार सुनील छेत्री गेल्या आठवड्यात ISLच्या सातव्या मोसमासाठी गोव्यामध्ये होता. या मोसमात बंगळुरुची कामगिरी निराशाजनक राहिली होती. बंगळुरुचं आव्हान लीग स्टेजमध्येच संपुष्टात आलं. बंगळुरु पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर होती. बंगळुरुला 20 पैकी 5 सामन्यातच विजय मिळवता आला होता. तर 8 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर उर्वरित 7 सामने हे अनिर्णित राहिले होते. सुनीलसाठी एक खेळाडू म्हणूनही हा मोसम खराब राहिला. या पर्वात सुनीलने 20 मॅचमध्ये फक्त 8 गोल लगावता आले.
जूनमध्ये टीम इंडियाचे सामने
पुढील 2 महिने टीम इंडियाला कोणतेच सामने खेळायचे नाहीयेत. त्यामुळे सुनीलकडे कोरोनामधून सावरण्यासाठी पर्याप्त वेळ आहे. दरम्यान टीम इंडिया जून महिन्यात सुनीलच्या नेतृत्वात आशियाई क्वालिफायर स्पर्धेत उतरणार आहे. भारताला 3-15 जून दरम्यान कतार, बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध सामने खेळायचे आहेत.
अनेक क्रीडापटूंना कोरोना
दरम्यान कोरोना झालेला सुनील हा एकमेव फुटबॉलपटू नाहीये. याआधी पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) कोरोनाची बाधा झाली होती. आतापर्यंत अनेक स्टार क्रीडापटूंना कोरोनाची लागण झाली आहे.
संबंधित बातम्या :
रिंगमध्ये परतण्यासाठी बॉक्सर विजेंदर सिंग सज्ज, गोव्यात जहाजाच्या डेकवर रंगणार सामना
Tiger Woods : जगप्रसिद्ध गोल्फर टायगर वूड्सचा भीषण अपघात
(indian football captain sunil chhetri tested corona positive)