IPL 2021 | आयपीएलच्या नव्या मोसमात नवी टीम दिसण्याची शक्यता, बीसीसीआयची जोरदार तयारी

आयपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात नेहमीप्रमाणे मार्चमध्ये होईल, असं काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला होता.

IPL 2021 | आयपीएलच्या नव्या मोसमात नवी टीम दिसण्याची शक्यता, बीसीसीआयची जोरदार तयारी
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 3:56 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील अंतिम सामन्यात (IPL 2020 FINAL) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने मात करत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. यासह या मोसमाचा इथेच शेवट झाला. यावेळेस कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाला जवळपास 5 महिन्यांच्या विलंबाने सुरुवात झाली. मात्र आयपीएलचा 14 व्या हंगामाची सुरुवात (IPL 2021) सालाबादप्रमाणे मार्च महिन्यातच होईल, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (BCCI Sourav Ganguly) व्यक्त केला होता. दरम्यान या 14 व्या हंगामात आणखी एका संघाची भर पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. indian premier league 2021 The bcci is planing the inclusion of the 9th team in ipl 2021

सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय आयपीएल स्पर्धेत आणखी एक टीम वाढवण्याच्या तयारीत आहे. याबाबत बीसीसीआयने कोणतीच औपचारिक माहिती दिली नाहीये. पण आयपीएलमध्ये नव्याने आणखी एक संघ समाविष्ट करण्यात येईल, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकूण 8 संघच खेळत आले आहेत. मात्र जर आगामी मोसमात नवी टीम जोडली गेली, तर त्या मोसमात एकूण संघांची संख्या ही 9 होईल. त्यामुळे या आगामी मोसमात नव्याने बदल अपेक्षित असतील.

कोरोनामुळे ऑक्शनच्या कार्यक्रमात बदल?

दरवेळेस आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा लिलाव करण्यात येतो. यामध्ये अनेक संघ खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात त्यांना समाविष्ट करुन घेतात. मात्र आगामी आयपीएल स्पर्धेसाठीचा ऑक्शन कार्यक्रम महिन्याभराच्या विलंबाने होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनुसार मिळत आहे. याबाबत बीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही यााआधी वक्तव्य केलं होतं.

तसेच बीसीसीआय आयपीएलच्या 14 व्या मोसमात नव्या संघ जोडण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे जर नववा संघ जोडला गेल्यास, आयपीएलच्या इतर बाबतीत बदल अपेक्षित असतील. यामध्ये साखळी फेरीतील संघाच्या सामन्यांची संख्या यासारख्या बाबींमध्ये बदल होऊ शकतो. यासर्व बाबींमुळे बीसीसीआय ऑक्शनचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे सविस्तररित्या घेण्यासाठी इच्छुक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

खेळाडूंची अदलाबदली

आगामी मोसमात संबंधित टीम मॅनेजमेंट खेळाडू्ंची अदलाबदली करण्यात इच्छुक असणार आहेत. या मोसमात अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे या युवा खेळाडूंना आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी टीम मॅनेंजमेंट आग्रही असेल.

“लस सापडल्यास आयपीएल भारतात”

“येत्या फेब्रुवारी-मार्च पर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होईल, अशी आशा करुयात. असे झाल्यास नक्कीच आयपीएलच्या 14 व्या मोसमाचे आयोजन भारतात केले जाईल, असं सौरव गांगुली काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. “तसेच जर कोरोनावर लस सापडली नाही, तर आपल्यासमोर स्पर्धेसाठी यूएईचा पर्याय आहेच”, असंही सौरवने नमूद केलं होतं. दरम्यान टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

indian premier league 2021 The bcci is planing the inclusion of the 9th team in ipl 2021

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.