नवी दिल्ली : भारतीय सैन्यातील हवालदार अनुज तालियान यांनी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या 11 व्या जागतिक बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुवर्ण पदक (Indian soldier won in world body building) पटकावले आहे. अनुज तालियान हे मेरठच्या सरधना या ठिकाणी राहतात. यापूर्वी अनुज यांनी 100 किलो गटात सुवर्णपदक जिंकले आहे. सुवर्णपदक (Indian soldier won in world body building) विजेत्या अनुज हे भारतात परतल्यावर त्यांचे जोरदार स्वागत झाले.
अनुज तालियान हे 2010 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. सध्या ते मद्रासच्या इंजिनिअर ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. भारतीय वंशाच्या अनुज यांनी दक्षिण कोरियातील शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय गाण्यावर बॉडीबिल्डिंग केली. यावेळी त्यांनी बाहुबली या चित्रपटातील गाणे लावले. त्यामुळे अनुज यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
सुवर्णपदक विजेता अनुज हे भारतात परतल्यानंतर त्यांचे मायदेशी जोरदार स्वागत झाले. तसेच बंगळुरुला पोहोचल्यानंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॅली काढत अनुज यांना सन्मानित केले. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 2018 मध्ये अनुज तालियान यांनी मिस्टर इंडिया या स्पर्धेतही खिताब मिळवला होता.
अनुज यांचा भाऊ श्यामवीर तालियान यांनीसुद्धा आतापर्यंत अनेक शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेतले आहेत. विशेष म्हणजे श्यामवीर यांनी नौदल, वायूदल आणि सैन्यातीलही शरीरसौष्ठव स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे. श्यामवीर तालियान हे अनुज यांचे प्रशिक्षक आहेत.
अनुज यांनी राष्ट्रीय पुरस्कारही मिळवले आहेत. तसेच 2018 मध्ये Services Championship मध्येही त्यांनी विजय मिळवला होता. अनुज हे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. त्यावर ते आपल्या वर्कआऊटचे व्हिडीओही शेअर करतात.