Ind Vs Aus | मालिका गमावल्यानंतर तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होऊ शकतात ‘हे’ तीन बदल

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघात काही बदल होऊ शकतात.

Ind Vs Aus | मालिका गमावल्यानंतर तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होऊ शकतात 'हे' तीन बदल
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 11:51 PM

सिडनीऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला (Ind Vs Aus) सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाची चव चाखावी लागली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला 66 धावांनी पराभव स्वीकारावा लागला तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी भारत पराभूत झाला. दोन्ही एकदिवसीय सामन्यांत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय बोलर्सची पिसे काढली. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघात काही बदल होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. (Indian team May have 3 Changes in 3 rd odi Vs Australia)

जसप्रीत बुमराह दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये खूपच महागडा ठरला. दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी बुमराहला टार्गेट करत त्याच्याविरुद्ध आक्रमक खेळ केला तर नवदीप सैनीने आयपीएलमध्ये जी पॉवर दाखवली ती पॉवर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दाखवता आली नाही. भारतीय संघात सध्या शार्दुल ठाकूर, टी-नटराजन आणि कुलदीप यादवसारखे खेळाडू आहेत, ज्यांचा तिसर्‍या वनडेमध्ये समावेश होऊ शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना 2 डिसेंबर रोजी खेळला जाईल.

बुमराहने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 20 षटके टाकली. या 20 षटकांमध्ये त्याने 152 धावा खर्च केल्या. बुमराहने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 73 धावा तर दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात 79 धावा दिल्या आहेत. बुमराहच्या बॉलिंगच्या दृष्टीने विचार केल्यास त्याने खूपच रन्स दिल्या आहेत ज्याची भारतीय संघाला अपेक्षा नव्हती. अशाही परिस्थितीत बुहराह भारतीय संघाचं प्रमुख अस्त्र असल्याने त्याला तिसऱ्या वनडेमधून वगळणार नाही.

शेवटच्या वनडेमध्ये मोहम्मद शमीच्या जागी शार्दूल ठाकूर, नवदीप सैनीच्या जागी टी-नटराजनला संधी मिळू शकते. तसंच युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला देखील संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातीये.

जर मयांक अग्रवालला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं तर त्याच्याजागी के.एल. राहुलला सलामीला खेळण्याची संधी मिळेल. आयपीएलच्या तेराव्या मोसमात के.एल. राहुलने पंजाबकडून खेळताना दिमाखदार खेळाचं प्रदर्शन करत सातत्यपूर्ण कामगिरी केली. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना 2 डिसेंबर रोजी अ‌ॅडलेडमध्ये खेळला जाईल.

(Indian team May have 3 Changes in 3 rd odi Vs Australia)

संबंधित बातम्या

India vs Australia 2020, 2nd Odi | ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात कोहलीचा ‘विराट’ कारनामा

India vs Australia 2020, 2nd Odi | जिंकलास भावा ! ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय पठ्ठ्याकडून ऑस्ट्रेलियन तरुणीला प्रपोज, व्हिडीओ व्हायरल

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.