भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

भारत विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) जास्त रवी शास्त्रींची (Ravi Shastri) टीम आहे, असं मोठं वक्तव्य इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसरने (Monty Panesar) केलं आहे.

भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य
रवी शास्त्री आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 7:31 AM

मुंबई : भारत विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) जास्त रवी शास्त्रींची (Ravi Shastri) टीम आहे, असं मोठं वक्तव्य इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसरने (Monty Panesar) केलं आहे. भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम असल्याचं कारण सांगताना मॉन्टी म्हणतो की रवी शास्त्रींनी संघातील खेळाडूंना स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवलं. त्यांनी भारतीय संघाला एक आत्मविश्वास दिला. जिंकण्याचा मंत्र दिला, असं मॉन्टी पनेसर म्हणाला. (Indian team more of Ravi Shastris team than Virat kohli Says Monty Panesar)

भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन आस्मान दाखवलं

भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाच्या भूमीत जाऊन आस्मान दाखवलं. शिवाय विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताने ही अद्वितीय कामगिरी करुन दाखवली. यावेळी रवी शास्त्री यांचा मोठा वाटा राहिला. त्यांनी संघाला आत्मविश्वास दिला. तुम्ही ऑस्ट्रेलियाला पराभूत करु शकता असं म्हणत विजयी मंत्र दिला आणि भारतीय संघातल्या खेळाडूंनी खरोखर सिरीजमध्ये पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित केलं. हे काही एखाद्या जादुपेक्षा कमी नव्हतं, असं मॉन्टी म्हणतो.

शास्त्रींनी भारतीय संघाला आत्मविश्वास दिला

अॅडलेड टेस्टमध्ये भारतीय संघ 36 रन्सवर ऑलआऊट झाल्यावर भारताची नामुष्की झाली होती. त्यात नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला होता. अशावेळी अजिंक्य रहाणेने भारतीय संघाची सूत्रं हातात घेतली आणि रवी शास्त्रींनी संघाला आत्मविश्वास देत विराटच्या अनुपस्थितीत करिष्मा करुन दाखवला. एखाद्या संघाला जिंकण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो शास्त्रींनी भारतीय संघाला दिला. भारतीय संघालाल दुखापतींचं ग्रहन लागलं होतं. अशावेळी संघाचं मानसिक स्वास्थ शास्त्रींनी ढळू दिलं नाही, अशा शब्दात पनेसरने शास्त्रींचं कौतुक केलं.

भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम

भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन पराभूत केलं. यामध्ये कोच म्हणून रवी शास्त्रींचा मोठा वाटा राहिला. ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी रवी शास्त्रींनी भारतीय संघाला मोठी मदत झाली. पाठीमागच्या काही महिन्यांपासून जर तुम्ही सारासार विचार कराल किंवा निरीक्षण कराल तर विराटपेक्षा अधिक रवी शास्त्रींची टीम वाटेल, असं सरतेशेवटी मॉन्टी म्हणाला.

(Indian team more of Ravi Shastris team than Virat kohli Says Monty Panesar)

हे ही वाचा :

‘बाहुबली रिषभ पंत’, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसोबत काय करतोय?

मुरलीधरनचा कसोटी क्रिकेटमधला 800 विकेट्सचा रेकॉर्ड अश्विन तोडू शकतो, या दिग्गजाची भविष्यवाणी

‘या’ भारतीय खेळाडूमुळे कसोटी क्रिकेट पाहावसं वाटत, इंग्लंड क्रिकेटपटूची कबुली

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.