सेमीफायनलमध्येच दमछाक, विश्वचषकात भारताच्या नावावर लाजिरवाणा विक्रम
विश्वचषकात भारतीय संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंद झालाय. विश्वचषकात 5 धावांवर 3 विकेट गमावणारा भारत पहिलाच संघ ठरलाय. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता.
लंडन : ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर न्यूझीलंडने सुरुवातीलाच भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलंय. सुरुवातीच्या 5 धावांमध्ये महत्त्वाचे फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल प्रत्येकी 1-1-1 धावा करुन बाद झाले. यासोबतच विश्वचषकात भारतीय संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंद झालाय. विश्वचषकात 5 धावांवर 3 विकेट गमावणारा भारत पहिलाच संघ ठरलाय. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता.
भारतीय संघाने पहिल्या 5 धावांमध्ये 3 विकेट गमावल्या. यापूर्वी 1996 च्या विश्वचषकात मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात असाच विक्रम नोंदवला गेला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाने 8 धावात 3 विकेट गमावल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने तेव्हा 8 बाद 207 धावा करत सामनाही जिंकला होता.
ओल्ड ट्रॅफर्डवर 1952 चा किस्सा
ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारतीय संघाची यापूर्वी 1952 मध्ये कसोटी सामन्यात अशीच अवस्था झाली होती. 4 धावसंख्या असताना भारताने पहिली विकेट गमावली होती. तर 5 धावांवर 3 आणि 17 धावांवर 5 विकेट्स होत्या. त्यावेळी संपूर्ण भारतीय संघ 58 धावात बाद झाला होता.
न्यूझीलंडच्या 239 धावा
अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने खराब सुरुवातीनंतरही 239 धावांचं आव्हान दिलंय. पावसामुळे नियोजित दिवसाचा खेळ पुढे ढकलावा लागला होता. राखीव दिवसाला 46.1 षटकावरुन पुढे खेळ सुरु झाल्यानंतर न्यूझीलंडने 8 बाद 239 धावा केल्या, ज्यामध्ये कर्णधार केन विल्यम्सन 67 आणि रॉस टेलर 74 यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3, तर हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.
संबंधित बातम्या :