टीम इंडियाचा ‘हा’ स्टार खेळाडू पुन्हा बोहल्यावर चढणार, कोण आहे तो?

के.एल. राहुलनंतर भारताचा आणखी एक खेळाडू अडकतोय विवाह बंधनात, महत्त्वाचं म्हणजे आधी त्याचा विवाह झाला असून तो पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकत आहे.

टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू पुन्हा बोहल्यावर चढणार, कोण आहे तो?
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 5:43 PM

मुंबई : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे पांड्या पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे. हार्दिक पांड्याने क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे. टी-20 क्रिकेट फॉरमॅटमधील आता झालेल्या मालिकांमध्ये हार्दिकने नेतृत्त्व सांभाळलं होतं. भारताचा भावी कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याकडे पाहिलं जातं. अशातच पांड्या पुन्हा एकदा विवाह करणार असल्याने त्याची सर्वत्र चर्चा आहे. पांड्याचा विवाह झाला असताना परत कोणासोबत पांड्या विवाह करत आहे? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले आहेत.

हार्दिक पांड्या त्याच्याच पत्नीसोबत लग्न करणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हार्दिकने उदयपूरची निवड केली आहे. हार्दिक पांड्याने आधी लग्न केलं असताना आता पुन्हा का लग्न करत आहे? याच कारण म्हणजे हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मुंबईत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यावेळी कोरोनाची साथ असल्यामुळे घरच्यांच्या उपस्थितीतच विवाह पार पडला होता.

हार्दिक पांंड्याने डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी उदयपूरची निवड केली आहे. मात्र कोणत्या हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा होणार आहे याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नाही. लग्नाचे कार्यक्रम 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. हळद, मेहंदीसह अन्य कार्यक्रमही होणार आहेत. 14 फेब्रुवारीला हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न पार पडणार आहे. या लग्नाला क्रिकेट आणि बॉलिवूडमधील स्टार्स उपस्थित राहू शकतात.

उदयपूरमध्ये याआधी अनेक डेस्टिनेशन वेडिंग्स झाले आहेत. यामधील उदय विलास, लीला, लेक पॅलेस, फतेह प्रकाश आणि जग मंदिर सितारा ही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. यामधीलच एका हॉटेलमध्ये पांड्याचं डेस्टिनेशन वेडिग होणार असल्याचं बोलंल जात आहे.

दरम्यान,  हार्दिक पांड्याने आतापर्यंत 11 कसोटी, 71 एकदिवसीय, 87 एकदिवसीय आणि 107 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत 1 शतकासह 532 धावा, वनडेत 9 अर्धशतकांसह 1518 धावा, टी 20 तीन अर्धशतकांसह 1271 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कसोटीत 17, वनडेत 68 आणि टी 20मध्ये 69 गडी बाद केले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.