4 बॅट्समन मिळून पहिल्या विकेटसाठी 408 रन्सची पार्टनरशीप, चौघांचीही शतकं, क्रिकेटच्या इतिहासातला अफलातून रेकॉर्ड!
पहिला डाव.... पहिली विकेट..... चार खेळाडू..... आणि 400 रन्सची भागीदारी हे ऐकायला आणि समजायला काहीतरी मुश्कील वाटतंय ना... आपण जरा सोप्या पद्धतीने समजून घेऊयात हे प्रकरण नेमकं काय आहे.... (indian top order Batsman Scoring hundred Against bangladesh test match series)
मुंबई : पहिला डाव…. पहिली विकेट….. चार खेळाडू….. आणि 408 रन्सची भागीदारी हे ऐकायला आणि समजायला काहीतरी मुश्कील वाटतंय ना… आपण जरा सोप्या पद्धतीने समजून घेऊयात हे प्रकरण नेमकं काय आहे…. भारत आणि बांगलादेश (India vs bangladesh) यांच्यातली 2007 सालची क्रिकेट मॅच… ही कसोटी मॅच होती… या कसोटी मॅचमध्ये पहिल्या विकेटसाठी 408 धावांची भागीदारी पाहायला मिळाली, वास्तविक भागीदारी म्हटलं की दोन बॅट्सममधली समजली जाते परंतु ही भागीदारी चार खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली… तीही पहिल्या विकेटसाठी तब्बल 408 धावांची भागीदारी आणि विशेष म्हणजे चारही खेळाडूंनी धमाकेदार शतकं ठोकले होती…! (indian top order Batsman Scoring hundred Against bangladesh test match series)
अद्वितीय विक्रमाची नोंद
आजपासून बरोबर 14 वर्षांपूर्वी बांगलादेशची राजधानी ढाक्यात एक अनोखा रेकॉर्ड बनला. जिथं चार फलंदाजांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 408 धावांची भागीदारी रचली. फक्त एवढंच नाही तर सुरुवातीच्या चारही फलंदाजांनी आक्रमक शतक झळकावली. 25 मे 2007 रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मॅच पार पडली जिथं हा अनोखा विक्रम नोंदवला गेला.
एकही विकेट न गमावता 408 रन्सची पार्टनरशीप
सलामीवीर दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) आणि वसीम जाफरने ()Wasim Jaffer भारतीय डावाची सुरुवात केली. या दोघांनी बांगलादेशी बोलर्सला चांगलंच सतावलं. 175 धावांपर्यंत दोघंही बांगलादेशी बोलर्सचा समाचार घेतला. पण त्यानंतर कार्तिकला दुखापत झाली आणि तो रिटायर झाला, तो शतकाच्या जवळच होता. अशाlच फलंदाजी करण्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) क्रिजवर आला. द्रविड आणि जाफर यांनी 281 रन्सपर्यंत धावफलक नेला. यादरम्यान जाफरने दमदार शतक पूर्ण केलं. 138 रन्स करून तोही तोदेखील रिटायर झाला.
स्कोअर बोर्डवर होत्या 281 धावा आणि संघाची एकही विकेट गेलेली नव्हती… तोपर्यंत दोन बॅट्समन रिटायर झाले होते… आता क्रीजवर होते द्रविड आणि सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar)…. दोघांनीही भारताला चारशे धावांच्या पुढे पोहोचवलं… तोपर्यंत द्रविडने आपलं शतक पूर्ण केलं होतं. भारताची एकही विकेट पडलेली नव्हती. पुढे सचिन तेेडुलकरने देखील शतक झळकावलं. भारतीय फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 408 धावांची अनोखी पार्टनरशिप केली. संघाचा स्कोअर 413 धावा असताना द्रविड 129 रन्स करून आउट झाला.
चारही फलंदाजांची शतकं
क्रिकेटच्या इतिहासात हा पहिल्यांदाच असा रेकॉर्ड झाला होता जिथे एकही विकेट न गमावता चार फलंदाजांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 408 धावांची पार्टनरशीप रचली होती. आणि विशेष म्हणजे सुरुवातीच्या चारही फलंदाजांनी शतके ठोकली होती.
(indian top order Batsman Scoring hundred Against bangladesh test match series)
हे ही वाचा :
WTC Final : इंग्लंडच्या भूमीत विराटची बॅट बोलते का? पाहा विराटचा खास इंग्लंड रिपोर्ट…!