वेदानंतर आणखी एका महिला क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे आईचं निधन

वेदा कृष्णामुर्तीनंतर आणखी एका महिला क्रिकेटवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. भारतीय महिला संघाची महिला क्रिकेटर प्रिया पुनिया (Priya Puniya) हिच्या आईचं कोरोनाने निधन झालंय. (Indian Women Cricketer Priya Punia Mother Death Due To Covid 19)

वेदानंतर आणखी एका महिला क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे आईचं निधन
भारतीय महिला संघाची महिला क्रिकेटर प्रिया पुनिया (Priya Puniya) हिच्या आईचं कोरोनाने निधन झालंय.
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 6:50 AM

मुंबई : वेदा कृष्णामुर्तीनंतर (veda krishnamurthy) आणखी एका महिला क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. भारतीय महिला संघाची महिला क्रिकेटर प्रिया पुनिया (Priya Puniya) हिच्या आईचं कोरोनाने निधन झालंय. पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी प्रिया पुनिया हिच्या आईला कोरोना संसर्ग जडला होता. मात्र कोरोनाविरोधी लढाई जिंकण्यात प्रियाच्या आईला यश आलं नाही. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Indian Women Cricketer Priya Punia Mother Death Due To Covid 19)

आईच्या निधनानंतर प्रियाची भावूक पोस्ट

आईचं निधन झाल्यानंतर प्रियाने भावूक पोस्ट लिहिलीय. तिने तिच्या आईसोबतचा फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियाच्या भावना वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी उतरलंय.

मला कळतंय की तू मला नेहमी मजबूत हो असं का सांगायचीस… तुला माहिती होतं की एक दिवस तू गेल्यानंतर ते दु:ख पचवण्याची ताकद माझ्याकडे असली पाहिजे. मला तुझी खूप आठवण येतीय आई… तू किती दूर आहेस, याचा मला काही फरक पडत नाहीय. पण मला माहितीय तू नेहमी माझ्या साथीला असशील, माझी दिशादर्शक आई…!

View this post on Instagram

A post shared by Priya Punia (@priyapunia16)

लोकांना नियम पाळण्याचं आवाहन

प्रियाने आईसोबतचा फोटो शेअर करताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेले नियम लोकांनी पाळायला हवेत, असं आवाहन केलं आहे. प्रियाने म्हटलंय, “कृपया नियमांचं पालन करा, हा व्हायरस खूप जीवघेणा आहे… ”

वेदा कृष्णमुर्तीच्या आई आणि बहिणीचं कोरोनाने निधन

भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर देखील (Veda Krushnamurthy) दु:खाचा डोंगर कोसळलाय.  एप्रिल महिन्यात तिच्या आईला कोरोनाने हिरावून नेलं. त्या दुखा:ची आसवं आणखी पूर्णपणे पुसलीही गेली नसताना तिच्या बहिणीचा 06 मे रोजी कोरोनाने मृत्यू झालाय. आई आणि बहिणीच्या अकाली मृत्यूने वेदा कृष्णमुर्ती उन्मळून पडलीय. केवळ 15 दिवसांत घरातील दोन जीवाभावाची माणसं वेदाला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली आहेत.

वेदाची बहीण 45 वर्षीय वत्सला यांचं निधन चिक्कमंगलुरुच्या एका खाजगी रुग्णालयात झालं. त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र उपचारांना त्या योग्य प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर 06 मे रोजी रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

(Indian Women Cricketer Priya Punia Mother Death Due To Covid 19)

हे ही वाचा :

भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.