Women’s Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी महिला क्रिकेट टीम जाहीर , जाणून घ्या वेळाप
आशिया स्पर्धेतील अंतिम सामना 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
महिला आशिया चषक (Women’s Asia Cup 2022) पुढच्या महिन्यात बांग्लादेशमध्ये (Bangaladesh) होणार आहे. त्यासाठी महिला क्रिकेट टीमची निवड करण्यात आली आहे. जुन्या इंडिया टीममध्ये (Team India) अधिक बदल करण्यात आलेला नाही. अनुभवी महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत आशिया चषकाची रंगत पाहायला मिळणार आहे. कारण यामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, थायलंड आणि युएई संघाचा समावेश आहे. काही टीमनी आपली खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. तर श्रीलंका, युएई, थायलंड या महिला टीमने अद्याप आपले खेळाडू जाहीर केलेले नाहीत.
आशिया चषक स्पर्धेतील महिला क्रिकेट संघाचे वेळापत्रक
पहिला सामना- भारत विरुद्ध श्रीलंका, 1 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता
दुसरा सामना – भारत विरुद्ध मलेशिया, 3 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता
तिसरा सामना – भारत विरुद्ध UAE, 4 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता
चौथा सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान, 7 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता
पाचवा सामना- भारत विरुद्ध बांगलादेश, 8 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता
6 वा सामना- भारत विरुद्ध थायलंड, 10 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता
आशिया स्पर्धेतील अंतिम सामना 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
महिला क्रिकेट टीम
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबबिनिनी मेघना, रिचा घोष (डब्ल्यूके), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, के.पी. नेव्हीग्रे