भारतीय महिला संघाच्या धडाकेबाज खेळाडूला कोरोनाची लागण, घरातच आयसोलेट
भारतीय महिला संघाची धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौर हिला कोरोनाची लागण झाली आहे. Harmanpreet kaur Corona positive
मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar), आक्रमक खेळाडू युसूफ पठाण (Yusuf Pathan) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) याच्यानंतर आता भारतीय महिला संघाची धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) कोरोनाची लागण झाली आहे. हरमनप्रीतला कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने टेस्ट केली असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ती घरातच आयसोलेट असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे. (Indian Womens Cricketer Harmanpreet kaur Tested Corona positive)
भारतीय महिला संघाची नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेत हरमनप्रीत भारतीय संघात सामिल होती. ही मालिका पार पडल्यानंतर हरमनप्रीतला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने तिने टेस्ट केली असता तिला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. हरमनप्रीतशिवाय भारताच्या आणखी चार माजी खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.
डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार
द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार पटियालामध्ये राहणाऱ्या हरमनप्रीतला कोरोनाची बाधा झाल्याने डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. तिला घरातच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र अजूनही हरमनप्रीतकडून यासंबंधीची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, किंवा संबंधित वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
हरमनप्रीत टी 20 सिरीज खेळली नव्हती
हरमनप्रीतने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे एकदिवसीय सामने खेळले होते. 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 150 रन्स केले. मात्र टी ट्वेन्टी सिरीजमध्ये ती दुखापतीच्या कारणास्तव खेळी शकली नाही.
सचिन, युसूफ आणि आता इरफानलाही कोरोनाची बाधा
भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज, मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर माजी धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाणची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यापाठोपाठ आता भारतीय संघाचा माजी ऑलराऊंडर आणि युसूफचा भाऊ इरफान पठाणलाही कोरोनाने गाठलं आहे. इरफानने सोमवारी आलल्या ट्विटरवर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. आपल्याला कोरोनाचे कुठलेही लक्षणं नाहीत. पण कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आपण होम आयसोलेशनमध्ये असल्याचं इरफानने सांगितलंय.
(Indian Womens Cricketer Harmanpreet kaur Tested Corona positive)
IPL 2021 : गोलंदाजांचे कर्दनकाळ, पांड्या ब्रदर्स आणि सूर्यकुमार यादव मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल, सहाव्यांदा जेतेपद मिळवणार?https://t.co/hLiUTenGWV#MumbaiIndians #HardikPandya #Krunalpandya #SuryakumarYadav #MI #IPL2021 #IPL #ipl14
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
हे ही वाचा :
Irfan Pathan Corona : सचिन, युसूफ पाठोपाठ इरफान पठाणही कोरोना पॉझिटिव्ह!
कसोटीच नाही तर टी-20 आणि वनडेतही इंग्लंडला धूळ चारली, सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकुळ