
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून आज भारताला धक्कादायक बातमी मिळाली. भारताची दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला आज फायनलआधी अपात्र ठरवण्यात आलं. 50 किलो वजनी गटात उतरलेल्या विनेशच वजन निश्चित मर्यादेपेक्षा जास्त होतं. विनेशच वजन मंगळवारी रात्री 2 किलो जास्त होतं. तिच वेट 52 किलो होतं. स्पोर्ट्स स्टारच्या रिपोर्टनुसार विनेशने वजन कमी करण्यासाठी केस, नख सुद्धा कापली. तिने स्वत:च रक्त सुद्धा काढलं. पण तिच वजन 50 किलो 150 ग्रॅम भरलं. त्यामुळे सुवर्णपदक जिंकण्याच स्वप्न भंग पावलं.
अनेक लोकांच्या मनात प्रश्न असेल, रक्त काढल्यामुळे वजन कमी होतं का?. वजन कमी होत असेल तर किती रक्त काढता येऊ शकतं. किती रक्त काढल्याने वजन कमी होतं. याबद्दल एक्सपर्ट्स काय सांगतायत ते जाणून घेऊया. सफदरजंग रुग्णालय कम्युनिटी मेडिसिन विभागाचे एचओडी प्रोफेसर डॉ. जुगल किशोर यांनी सांगितलं की, ब्लड काढल्यामुळे किंवा ब्लड डोनेट केल्याने वजन कमी होऊ शकतं. पण हा फरक काही तासांसाठी असतो. उदहारणार्थ रक्त काढलं आणि लगेच वजन केलं, तर एक युनिट रक्त काढल्याने 300 ते 400 ग्रॅम वजन कमी होतं. आज ब्लड डोनेट केलं आणि उद्या वजन केलं, तर वजन कमी होत नाही.
रक्त काढल्यानंतर वजन किती तासांसाठी कमी होतं?
डॉ किशोर यांनी सांगितलं की, रक्त काढल्याने वजन 6 ते 12 तासांसाठी कमी होऊ शकतं. त्यानंतर तुम्ही वजन केलं, तर ते पहिल्यासारखच असेल. कुठल्याही व्यक्तीच्या शरीरातून एकावेळी एक युनिट रक्त काढलं जातं. एका युनिटमध्ये 350 मिलीग्राम ब्लड असतं. म्हणजे वजन तात्काळ कमी करण्यासाठी कोणी रक्त काढलं, तर 350 ग्रॅम वजन कमी होईल. पण हे काही तासांसाठीच असेल.
डॉ. कवलजीत सिंह काय म्हणाले?
दिल्लीचे वरिष्ठ फिजिशियन डॉ. कवलजीत सिंह यांनी सांगितलं की, जेव्हा तुम्ही ब्लड डोनेट करता तेव्हा शरीरात कॅलोरी बर्न होतात. शरीर नवीन रक्त बनवणं आणि रेड बल्ड सेल्सच्या निर्माणासाठी भरपूर ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे कॅलोरी बर्न होतात. वजन कमी होतं. पण हे काही तासांसाठीच असतं. शरीरात पुन्हा रक्त तयार झाल्यानंतर वजन पहिल्या इतकच असतं.