T20 World Cup 2022 : भारताच्या ‘डिव्हिलियर्स’ने पुन्हा खेळला विचित्र शॉट, पाहा व्हिडिओ
टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 186 धावा काढल्या.
आज टीम इंडियाचा (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) तिसरा सराव सामना सुरु आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यापासून खेळाडूंचं मनोबल वाढलं आहे. त्यामुळे टीम इंडियाची फलंदाजी अधिक चांगली होताना पाहायला मिळत आहे. केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव (Surykumar Yadhav) या दोन फलंदाजांनी आज पुन्हा ऑस्ट्रेलिया गोलंदाजांची चांगली धुलाई केली. सुर्यकुमार यादवचा एक शॉट मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
आशिया चषक, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आत्तापर्यंत सुर्यकुमार यादवने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत तो चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना आशा आहे.
आज टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव मॅच सुरु आहे, त्यामध्ये केएल राहूलने 32 चेंडूत 57 धावा केल्या आहेत, तर सुर्यकुमार यादवने 33 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली. आजच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने 6 चौकार आणि 1 षटकार लगावला आहे.
टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 186 धावा काढल्या.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलियन टीम अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा .