INDW vs AUSW: “आमच्या गोटात तणावाचं वातावरण होतं, पण..”, ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅथिंगची कबुली
भारताचे सुरुवातीचे तीन गडी झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास वाढला खरा. पण जेमिमा आणि हरमनप्रीत कौरनं चांगली भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या गोटात भीतीचं वातावरण निर्माण केलं. सामना विजयी झाल्यानंतर याबाबतची कबुली ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगनं दिली.
मुंबई : वुमन्स टी 20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला 5 धावांनी मात देत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सातव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. तर पाच वेळा विजय मिळवला आहे. उपांत्य फेरीच्या अतितटीच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चांगलाच घाम फोडला होता. पण काही चुका भारतीय संघाला भोवल्या आणि उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. ऑस्ट्रेलियन संघाच्या चांगल्या बॅटिंग लाईनअपचा भारतीय संघाला आधीच अंदाज होता. त्यामुळे 180 पर्यंत टार्गेट मिळेल या अपेक्षेने भारतीय संघ मैदानात उतरला होता. पण गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाला त्यांना कमी धावसंख्येवर रोखता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होत. भारताचे सुरुवातीचे तीन गडी झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास वाढला खरा. पण जेमिमा आणि हरमनप्रीत कौरनं चांगली भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या गोटात भीतीचं वातावरण निर्माण केलं. सामना विजयी झाल्यानंतर याबाबतची कबुली ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगनं दिली.
” आम्ही तणावात होतो. हा आमच्या सर्वोत्तम विजयांपैकी एक आहे. भारताने विजयासाठी आम्हाला चांगलंच झुंजवलं. एका क्षणी वाटत होतं की आता आमच्या हातून खेळ गेला. पण आम्ही सामना सोडला नाही. शेवटपर्यंत लढण्याचा आमचा निर्धार होता. आमचा आत्मविश्वास कामी आला. मी तर असं म्हणेण हरमनप्रीत कौर कमनशिबी आहे. ऐन मोक्याच्या ठिकाणी तुम्हाला संयम ठेवणं गरजेचं असतं. आम्ही गोलंदाजी चांगली होत नसून आम्ही संयम ठेवला. आम्ही अशा प्रकारे खेळलो की आम्हाला जिंकायचंच आहे. आता अंतिम फेरीसाठी सज्ज आहोत.”, असं मेग लॅनिंगनं सांगितलं.
काय झालं होतं टी 20 वर्ल्डकप 2020 स्पर्धेत
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 184 धावा केल्या आणि विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ 99 या धावसंख्येवर बाद झाला. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.
दोन्ही संघांची प्लेईंग 11
Australia Playing 11 : मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.
Team India Playing 11 : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.