INDW vs ENGW : सुपरवुमन रिचा घोष! नॅट सायवर ब्रंटचा घेतला जबरदस्त झेल Watch Video
भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 197 धावा केल्या. या डावात रिचा घोषची चर्चा रंगली.
मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानात पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 197 धावा केल्या आणि विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं. सुरुवातीला दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर डॅनी व्याट आणि नॅट सायवर ब्रंटने डाव सावरला. इंग्लंडची 2 धावांवर दोन गडी अशी स्थिती होती. त्यानंतर व्याट आणि ब्रंट जोडीने 138 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियासमोर धावांचं मोठं आव्हान उभं राहिलं. असताना रिचा घोष हीचा झेल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर रिचा घोषच्या झेलची चर्चा रंगली आहे. काही जणांनी तर रिचा घोषला सुपरवुमन्सचा किताब देखील देऊन टाकला आहे. झेल इतका जबरदस्त होता की, तुम्हीही पाहिला तर तसंच काहीसं म्हणाल. रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर रिचाने हा अप्रतिम झेल घेतला.
डॅनी व्याट आणि नॅट सायवर या जोडीने भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. तिसऱ्या गड्यासाठी 138 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात साइका इशाक हिला यश आलं. 75 धावांवर असताना ती यष्टीचीत झाली. त्यानंतर नॅट सायवर ब्रंट हीला बाद करण्याचं आव्हान होतं. 77 धावांवर असताना रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर कट लागली आणि थर्ड स्लिपच्या आसपास चेंडू होता. पण रिचाने क्षणाचाही विचार न करता उडी घेतली आणि अप्रतिम झेल घेतला. नॅट सायवर ब्रंटने 53 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या.
ICYMI!
A flying Richa Ghosh catch put an end to Nat Sciver-Brunt's 77-run knock 👏👏
WATCH 🎥🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/JxqvDulQfR pic.twitter.com/SMhfWHkOfn
— BCCI Women (@BCCIWomen) December 6, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): डॅनी व्याट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, नॅट सायवर-ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माहिका गौर