Syed Mushtaq Ali Trophy | मुंबईत क्वारंटाईन असलेल्या खेळाडूंना निकृष्ट दर्जाचं जेवण, बीसीसीआयकडे तक्रार

मुंबईतील हॉटेलमध्ये काही संघ क्वारंटाईन आहेत. येथे देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत खेळाडूंनी बीसीसीआयकडे तक्रार केली.

Syed Mushtaq Ali Trophy | मुंबईत क्वारंटाईन असलेल्या खेळाडूंना निकृष्ट दर्जाचं जेवण, बीसीसीआयकडे तक्रार
मुंबईतील हॉटेलमध्ये काही संघ क्वारंटाईन आहेत. येथे देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत खेळाडूंनी बीसीसीआयकडे तक्रार केली.
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 5:06 PM

मुंबई : अवघ्या काही दिवसांनी देशांतर्गत सर्वात मोठी टी 20 स्पर्धा अर्थात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला (Syed Mushtaq Ali Trophy) सुरुवात होत आहे. 10 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र या स्पर्धेच्या सुरुवातीआधीच याला गाळबोट लागलं आहे. या स्पर्धेसाठी काही संघ मुंबईत क्वारंटाईंन आहेत. या संघांच्या जेवणाची सोय हॉटेलकडून करण्यात आली आहे. मात्र या काही संघांकडून जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे या संघांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Inferior meal for quarantined players in Mumbai for Syed Mushtaq Ali tournament 2021)

नक्की प्रकरण काय ?

या स्पर्धेसाठी काही संघ मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. या ठिकाणी देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत 3 संघांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत या 3 संघांकडून बीसीसीआयकडे तक्रार करण्यात आली आहे.

या सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत अनेक संघ सहभागी होणार आहेत. या संघांना अनेक गृपमध्ये विभागण्यात आले आहे. या E ग्रृपमधील टीम या हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. ज्या हॉटेलमधून जेवणाबाबत तक्रार करण्यात आली, त्या ठिकाणी मुंबई, दिल्ली आणि केरळ संघ राहत आहेत. यामध्ये शिखर धवन, इशांत शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि धवल कुलकर्णी या सारखे स्टार खेळाडू थांबले आहेत. या ग्रृपमधील संघाच्या सामने मुंबईत खेळण्यात येणार आहेत.

नक्की तक्रार काय?

एका इंग्रजी वृत्तपत्राला यातील काही खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली. त्यानुसार “जेवण फार थंड होतं. तसेच नाश्त्याचा दर्जाही चांगला नव्हता. यानंतर हॉटेल प्रशासनाकडे याबाबत तक्रार करण्यात आली. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. यामुळे नाईलाज म्हणून या खेळाडूंनी बीसीसीआयकडे या सर्व प्रकाराची तक्रार केली. येथे मिळणारी पोळी ही पापडासारखी असेते. तसेच येथील भातामुळे वजन वाढण्याचा धोकाही आहे. खेळाडूंना आपल्या तब्येतीला जपावं लागतं. यामुळे बहुतेक खेळाडूंनी हा भात खाण्यास नकार दिला. येथील हॉटेलमधील जेवणाचे दरही फार जास्त आहेत. यामुळे आम्हाला बाहेरुन जेवण मागवण्याची परवानगी द्यावी”, अशी विनंतीही खेळाडूंकडून बीसीसीआयकडे करण्यात आली. मात्र कोरोनामुळे बीसीसीआयने ही विनंती फेटाळून लावली.

दरम्यान या तक्रारीनंतर हॉटेल शेफसोबत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत याबाबत तोडगा काढण्यात आला. हॉटेल प्रशासनाला पुन्हा जेवणाबाबत काही तक्रार येऊ नये, असा इशारा देण्यात आला, अशी माहिती मुंबई टीमचे अरमान मलिक पीटीआय या वृत्तसंस्थेद्वारे दिली.

संबंधित बातम्या :

Syed Mushtaq Ali Trophy साठी मुंबईची घोषणा, सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व

श्रीशांत इज बॅक… 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवणार!

अर्जून तेंडुलकर मुंबईच्या संघात, पण निवडीवर का वाद?

(Inferior meal for quarantined players in Mumbai for Syed Mushtaq Ali tournament 2021)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.