T20 World Cup 2022 : रशीद खानने खेळाडूवर मॅच सुरु असताना काढला राग, व्हिडीओ व्हायरल
श्रीलंकाविरुद्धच्या मॅचमध्ये ज्यावेळी रशीद खानने एका खेळाडूला बाद केले.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World cup 2022) पावसाचा फटका अनेक टीमला बसला आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान (afghanistan) टीमचा सुद्धा समावेश आहे. काल श्रीलंका टीम आणि आफगाणिस्तानची मॅच झाली. त्यामध्ये आफगाणिस्तानची टीम पराभूत झाली. तसेच न्यूझिलंड आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडची टीम विजयी झाली.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
श्रीलंकाविरुद्धच्या मॅचमध्ये ज्यावेळी रशीद खानने एका खेळाडूला बाद केले. त्यावेळी आनंद साजरा करण्यासाठी आलेल्या खेळाडूचं रशीदने डोकं पकडून दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिथं चाहत्यांनी इतका राग कशामुळे आल्या अशा देशील कमेंट केल्या आहेत.
विश्वचषक स्पर्धेत पाऊस पडत असल्यामुळे अनेक टीमचं नुकसान झालं आहे. कारण मॅच रद्द झाल्यानंतर दोन्ही टीमला एक-एक गुण मिळाला आहे. थोड्यावेळात टीम इंडियाची आणि बांगलादेशची आज मॅच होणार आहे.