Indian Grandmaster R Pragyanand: मूर्ती लहान पण किर्ती महान! बुद्धीबळपटू प्रज्ञानानंद बाबातचे Interesting Facts

दमदार कागिरीमुळे प्रज्ञानानंदचे कौतुक होत आहे. एवढ्या कमी वयात उल्लेखनीय कामगिरी करणारा प्रज्ञानानंद हा एकमेक भारतीय खेळाडू ठरला आहे. बुद्धीबळपटू प्रज्ञानानंद बाबातच्या या पाच महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यायलाच पाहिजे.

Indian Grandmaster R Pragyanand: मूर्ती लहान पण किर्ती महान! बुद्धीबळपटू प्रज्ञानानंद बाबातचे Interesting Facts
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 8:30 PM

नवी दिल्ली : मूर्ती लहान पण किर्ती महान! अशी म्हण आपल्याकडे आहे. या म्हणीला साजेशी अशी कामगिरी भारताचा बुद्धीबळपटू प्रज्ञानानंदने केली आहे. 16 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने(Indian Grandmaster R Pragyanand) पॅरासिन ओपन ‘अ’ बुद्धिबळ स्पर्धा 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेच्या नऊ फेऱ्यांमध्ये 8 गुण मिळवत प्रज्ञानानंदने साडेसात गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अलेक्झांडर प्रेडकेला चितपट करत ही स्पर्धा जिंकली. नऊ फेऱ्यांमध्ये 8 गुण मिळवले असूनही प्रज्ञानानंदने न हरता त्याने या स्पर्धेत अर्ध्या गुणांच्या आघाडीने स्पर्धा जिंकली आहे.

आगामी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत असलेल्या प्रज्ञानानंदने महिला ग्रँडमास्टर श्रीजा शेषाद्री, लाचाझेर योर्डानोव (बल्गेरिया), काझीबेक नोगेरबेक (कझाकस्तान), देशबांधव कौस्तव चॅटर्जी, आर्यस्तानबेक उराजेव (आर्यस्तानबेक उराजेव) या महिलांचा सलग सहा वेळी पराजय करुन विजय मिळवला.

या दमदार कागिरीमुळे प्रज्ञानानंदचे कौतुक होत आहे. एवढ्या कमी वयात उल्लेखनीय कामगिरी करणारा प्रज्ञानानंद हा एकमेक भारतीय खेळाडू ठरला आहे. बुद्धीबळपटू प्रज्ञानानंद बाबातच्या या पाच महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यायलाच पाहिजे.

  1. मेशबाबू प्रज्ञानानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. वयाच्या 5 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली आणि त्याने वयाच्या सातव्या वर्षी जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.
  2. वयाच्या नवव्या वर्षी प्रज्ञानानंदने 10 वर्षांखालील विजेतेपद पटकावले.
  3. ग्रँडमास्टर बनणारा तो जगातील पाचवा सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे.
  4. 2018 मध्ये ग्रँडमास्टरचा दर्जा मिळाला. तेव्हा प्रज्ञानानंद वय 12 वर्षे 10 महिने 13 दिवस होते.
  5. मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा तो केवळ तिसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे. त्याच्याआधी केवळ विश्वनाथन आनंद आणि पी हरिकृष्णा हे पराक्रम करू शकले.
  6. प्रज्ञानानंद अगदी लहान वयातच भावी बुद्धिबळात महान बनण्याची अफाट क्षमता दाखवली. त्याने 2013 मध्ये 8 वर्षांखालील गटात जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. यामुळे त्याला वयाच्या सातव्या वर्षी फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेक्स (FIDE) मास्टर ही पदवी मिळाली. यानंतर त्याने 2015 मध्ये चॅम्पियनशिपच्या 10 वर्षांखालील गटात विजय मिळवला.
  7. इंटरनॅशनल डेस इचेक्स (FIDE) तर्फे खेळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून संबोधीत केले जाते. हे ग्रँडमास्टरच्या खाली असलेले रँक आहे, जे बुद्धिबळातील सर्वोच्च जेतेपद आहे. हे विजेतेपद मिळवण्यासाठी खेळाडूला 2400 च्या स्थापित शास्त्रीय किंवा मानक FIDE रेटिंगपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन आंतरराष्ट्रीय मानदंड प्राप्त करणे आवश्यक आहे.
  8. KIIT इंटरनॅशनल ओपनमध्ये तिसरा आणि अंतिम नॉर्म पूर्ण करून, प्रज्ञानंधाने 2016 मध्ये 10 वर्षांच्या वयात हे विजेतेपद मिळवले. त्याच्या 2400 ELO रेटिंगने त्याला पदवी मिळवून दिली.
  9. प्रज्ञानानंद हा बुद्धिबळाच्या इतिहासातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे आणि विजेतेपद मिळवणारा सर्वात तरुण भारतीय आहे. ग्रँडमास्टर हा किताब मिळवण्यासाठी खेळाडूने 2,500 चे स्थापित शास्त्रीय किंवा मानक FIDE रेटिंग प्राप्त करणे आवश्यक असते.

28 जुलैपासून चेन्नई येथे होणार्‍या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रज्ञानानंद हा भारताच्या ब’ संघाचा एक भाग म्हणून प्रतिनिधीत्व करणार आहे. त्याने बुद्धिबळाच्या पटलावर आपल्या खेळाने आणि हुशार चालींनी लोकांना थक्क केले आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.