IPL 2023: 0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0… रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम
आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपद पटकवण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. पण गेल्या पर्वात मुंबईच्या संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यात रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम आहे.
मुंबई : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक जेतेपद पटकवण्याचा मान मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं पाचवेळा किताब जिंकला आहे. रोहित शर्माने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र असं असलं तरी मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे. आयपीएलमध्ये कोट्यवधी कमावणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम पाहून अनेक क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
आयपीएलमध्ये रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये आहे. पण एका लीगमध्ये उतरती कळा लागली तर पूर्ण सिझन फ्लॉप ठरतो. आयपीएलमध्ये रोहित शर्मा 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्म मनदीप सिंहसह टॉपवर आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये 222 डाव खेळले आहेत. यात 14 वेळा त्याला भोपळाही फोडता आला नाही.
रोहित शर्माने मागच्या पाच पर्वात 30 पेक्षा कमी सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट मागच्या चार वर्षात 130 पेक्षा कमी आहे. मागच्या पर्वात मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी होती. तेव्हा रोहित शर्माने 19.14 च्या सरासरीने 268 धावा केल्या होत्या.
रोहित शर्माच्या नावावर भलेही नकोसा विक्रम झाला असेल. पण सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या आयपीएल पर्वात रोहित शर्माने 178.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यात जाहीरात आणि एसोसिएशनचा समावेश नाही. या यादीत धोनी दुसऱ्या आणि विराट तिसऱ्या स्थानी आहे.
पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स समोर यावेळी मोठं आव्हान आहे. मागच्या पर्वात सर्वात शेवटी राहिल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची निराशा झाली होती. आता टीमला पुन्हा जेतेपद मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 2 एप्रिल 2023 रोजी विराट कोहलीच्या आरसीबी संघाशी असणार आहे.
मुंबई इंडियन्सचे खेळाडू
मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 टीम: रोहित शर्मा (कर्णधार), टिम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, देवल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कॅमरन ग्रीन, पीयूष चावला, डुआन जानसन, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल.