IPL Final : मुंबई मुंबई मुंबई, चेन्नईवर थरारक विजय !!!

हैदराबाद : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) अवघ्या 1 धावाने पराभव करत चौथ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर चेन्नईच्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. मुंबईने चौथ्यांदा आयपीएल चषक जिंकून इतिहास रचला. आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम […]

IPL Final : मुंबई मुंबई मुंबई, चेन्नईवर थरारक विजय !!!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

हैदराबाद : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) अवघ्या 1 धावाने पराभव करत चौथ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर चेन्नईच्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. मुंबईने चौथ्यांदा आयपीएल चषक जिंकून इतिहास रचला.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईने 8 विकेट गमावत चेन्नई सुपर किंग्जसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात उतरलेल्या चेन्नईनेही चांगली सुरुवात केली. मात्र, त्यांना या खेळीचे रुपांतर विजयात करता आले नाही. चेन्नईने 20 षटकात 7 बाद 147 धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर मलिंगाने मुंबईला विजय मिळवून दिला. चेन्नईकडून शेन वॉटसनने एकाकी झुंज देत  59 बॉलमध्ये धडाकेबाज 80 धावा केल्या. यात त्याच्या 4 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये दोन धावा घेण्याच्या प्रयत्न तो धावबाद झाला आणि चेन्नईच्या हातातोंडाशी आलेली मॅच मुंबईकडे झुकली.

मलिंगाची शेवटची ओव्हर

शेवटच्या षटकात चेन्नईला 6 चेंडूत 9 धावांची गरज होती. त्यावेळी स्ट्राईकवर शेन वॉटसन होता.

19.1  मलिंगा टू शेन वॉटसन  – 1 धाव

19.2 मलिंगा टू रवींद्र जाडेजा – 1 धाव

19.3 मलिंगा टू शेन वॉटसन – 2 धावा

19.4 मलिंगा टू शेन वॉटसन –  1 धाव (दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात धावबाद)

19.5 मलिंगा टू शार्दूल ठाकूर – 2 धावा

शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज – शार्दूल ठाकूर

19.6 – मलिंगा टू शार्दूल ठाकूर –  एलबीडब्ल्यू बाद!

मुंबईने मॅच अवघ्या 1 धावेने जिंकली !

मुंबईची बॅटिंग

दरम्यान, त्याआधी रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने 3 ओव्हरमध्ये 30 धावा कुटत जबरदस्त सुरुवात केली. धोनीचा विश्वासू गोलंदाज दीपक चहरच्या एकाच षटकात डीकॉकने जवळपास 20 धावा करत, चेन्नईच्या गोलंदाजीतील हवा काढली. मात्र पाचव्या षटकात शार्दूल ठाकूरने एका बाऊन्सरवर डीकॉकची विकेट घेत, मुंबईला पहिला झटका दिला. डीकॉकने 4 षटकारांसह 17 चेंडूत 29 धावा केल्या.

यानंतर मग दीपक चहरच्या पुढच्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा बाद झाला आणि सुसाट सुटलेल्या मुंबईच्या फलंदाजीला अक्षरश: ब्रेक लागला. रोहित 14 चेंडूत 15 धावा करुन बाद झाला. यानंतर मग सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना चेन्नईच्या गोलंदाजांनी अतिशय जखडून ठेवलं. सूर्यकुमारने 17 चेंडूत अवघ्या 15 तर किशनने 26 चेंडूत 23 धावा केल्या. रोहित-डीकॉकची फलंदाजी पाहून मुंबई 175 चा टप्पा वाटत असताना, सूर्यकुमार आणि ईशान किशनच्या फलंदाजीने त्यातील सर्व आवसान काढलं. या दोघांनाही इम्रान ताहीरने बाद केलं. त्यानंतर कृणाल पंड्या 7 चेंडूत 7 धावा करुन शार्दूल ठाकूरची शिकार ठरला. या सामन्यात हार्दिक पंड्यालाही मोठी फटकेबाजी करता आली नाही. 10 चेंडूत 16 धावा करुन तो माघारी परतला.

पंड्या बाद झाल्यामुळे मुंबईच्या उरल्या सुरल्या आशा केवळ किरॉन पोलार्डवर होत्या. पोलार्डने 25 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकार ठोकत नाबाद 41 धावा केल्याने मुंबईला आव्हानात्मक 149 धावांपर्यंत मजल मारता आली.  त्यामुळेच चेन्नईला पराभव करणं शक्य झालं.

लोखंडवाला परिसरात मोठ्या स्क्रिनची व्यवस्था

मुंबईत क्रिकेट चाहत्यांची अजिबात कमतरता नाही. त्यात  मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यासाठी अंधेरीमधील उच्चभ्रू लोखंडवाला परिसरात मोठ्या स्क्रिन लावण्यात आल्या होत्या. त्यावर क्रिकेट सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या मोठ्या स्क्रिनवर लाईव्ह मॅचचा आनंद घेणाऱ्या चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला.

इचलकरंजीत मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर जल्लोष
इचलकरंजीत मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर मोठा जल्लोष करण्यात आला. शहराच्या जनता चौकात 4 ते 5 हजार क्रिकेट चाहते रस्त्यावर जमा झाले आणि
त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. तसेच गुलालाची उधळण करत ढोल ताश्याच्या गजरावर नाचही केला.

मुंबई-चेन्नई चौथ्यांदा फायनलमध्ये आमने-सामने

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई आणि चेन्नई चौथ्यांदा जेतेपदासाठी भिडले. आतापर्यंत फायनलमध्ये मुंबईने 3 वेळा तर चेन्नईने एकदा विजय मिळवला. मुंबईने यंदा क्वालिफायर 1 मध्ये चेन्नईला हरवूनच फायनलमध्ये प्रवेश केला होता.

चेन्नई आठव्यांदा फायनलमध्ये

चेन्नई सुपर किंग्जने 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2018 आणि 2019 या वर्षात आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. यापैकी 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईने विजय मिळवला. त्यामुळे आयपीएलची तीन जेतेपदं चेन्नईच्या नावावर आहेत. चौथं विजेतेपद मिळवण्याचं स्वप्न मुंबईने धुळीला मिळवलं.

धोनी नवव्यांदा फायनलमध्ये

चेन्नईने आठव्यांदा फायनलमध्ये धडक दिली असली, तर कर्णधार धोनी नवव्यांदा फायनल खेळला. धोनी चेन्नईकडून आठव्यांदा तर पुणे सुपरजायंट्सकडून एकदा फायनलमध्ये खेळला आहे. धोनीनंतर सर्वाधिक फायनलमध्ये खेळणाऱ्यांमध्ये सुरेश रैनाचा नंबर लागतो. रैना 7 वेळा फायनलमध्ये खेळला आहे.

मुंबई पाचवेळा फायनलमध्ये

चेन्नईनंतर मुंबई इंडियन्सचा नंबर लागतो. मुंबई इंडियन्स 5 वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली होती. यापूर्वी 2010, 2013, 2015, 2017 आणि 2019 अशी पाचवेळा मुंबईने फायनलमध्ये धडक दिली. यापैकी मुंबईने 2013, 15,17 आणि  19 मध्ये विजय मिळवला आहे.

मुंबई विरुद्ध चेन्नई फायनलचा इतिहास

2010 – नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने मुंबईवर 22 धावांनी मात केली.

2013 – कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर मुंबईने चेन्नईवर 23 धावांनी विजय मिळवला.

2015 – ईडन गार्डन्सवर मुंबईने 41 धावांनी चेन्नईवर मात केली.

2019 – हैदराबादेतील राजीव गांधी स्टेडियमवर मुंबईकडून चेन्नईचा अवघ्या 1 धावेने पराभव

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.