IPL 2020 | पाच वेळेस विजेतेपद पटकावणाऱ्या तगडया मुंबईला पराभूत करण्यासाठी प्रज्ञान ओझा आणि दीपदास गुप्ताची बेस्ट टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम आहे.

IPL 2020 | पाच वेळेस विजेतेपद पटकावणाऱ्या तगडया मुंबईला पराभूत करण्यासाठी प्रज्ञान ओझा आणि दीपदास गुप्ताची बेस्ट टीम
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 1:08 AM

यूएई : आयपीएल (IPL 2020) इतिहासातील सर्वात यशस्वी टीम म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). मुंबई इंडियन्सने 13 व्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. मुंबईची विजेतेपद पटकावण्याची ही पाचवी वेळ ठरली. मुंबईने आयपीएलमध्ये आतापर्यंत भल्या भल्या संघांना पाणी पाजलंय. मुंबईला पराभूत करु शकेल असा संघ  टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी (Ipl Best Team) निवडला आहे. दीपदास गुप्ता (DeepDas Gupta) आणि प्रज्ञान ओझा (Pragyan Ojha) या दोघांनी आपल्या आयपीएलसाठी बेस्ट टीमची निवड केली (Ipl Best Playing Eleven) आहे. मुंबईविरुद्ध सामना झाल्यास दीपदास आणि प्रज्ञानने निवडलेला संघ मुंबईला पराभूत करु शकेल, या दृष्टीने या दोघांनी टीम निवडली आहे. मुंबईला कडवी झुंज देण्यासाठी या दोघांनी आपला सर्वोत्तम संघ तयार केला आहे. स्पोर्ट्स टुडेशी बोलताना दीपदास आणि प्रज्ञानने संघ निवडला आहे. IPL 2020 Best team of Pragyan Ojha and Deepdas Gupta to defeat five-time champions Mumbai

विराट-रोहितला संधी नाहीच

दीपदास आणि प्रज्ञान यांनी आयपीएलच्या 13 व्या मोसमात चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना आपल्या संघात संधी दिली आहे. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) स्थान दिलं नाहीये. “या मोसमात या दोघांशिवाय इतर खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे रोहित आणि विराटला संधी दिली नाही”, असं दीपदास आणि प्रज्ञानने सांगितलं.

पर्पल कॅपचा मानकरी रबाडाला डच्चू

प्रज्ञान आणि दीपदासने पर्पल कॅपविनर कगिसो रबाडाला (Kagiso Rabada) आपल्या संघात स्थान दिलेलं नाहीये. प्रज्ञान आणि दीपदासने रबाडाला स्थान का दिलं नाही, याबाबत स्पष्टीकरण दिलंय. “जो गोलंदाज पावर प्लेमध्ये विकेट्स मिळवून देऊ शकेल, अशाच गोलंदाजाला मी संघात स्थान देईल. रबाडापेक्षा थंगारासू नटराजन चांगली कामगिरी करु शकतो, तर मी थंगारासूला मी संघात स्थान देईन”, असं प्रज्ञान आणि दीपदास म्हणाला.

या मोसमात कगिसोने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. मात्र त्याला पावर प्लेमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा करण्याच्या नादात फलंदाज फटकेबाजी करतात. अशी फटकेबाजी करताना फलंदाज बाद होतात. यामुळे रबाडाला विकेट्स मिळाल्या. या कारणामुळे रबाडाला स्थान दिलं नाही.

दासगुप्ता आणि प्रज्ञानची बेस्ट टीम

दीपदास गुप्ता इलेव्हन : केएल राहुल, ख्रिस गेल, अंबाती रायडू, श्रेयस अय्यर, जेसन होल्डर, बेन स्टोक्स, रविंद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रविचंद्रन अश्विन, थंगारासू नटराजन आणि वरुण चक्रवर्ती

प्रज्ञान ओझा इलेव्हन : केएल राहुल, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, एबी डीव्हीलियर्स, जोस बटलर, रवींद्र जडेजा, राशिद खान, जोफ्रा आर्चर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि थंगारासू नटराजन

आशिष नेहराची आयपीएल 2020 बेस्ट टीम : के एल राहुल, डेव्हिड वॉर्नर, सूर्यकुमार यादव, एबी डीव्हीलियर्स, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह , राशिद खान, युजवेंद्र चहल, आणि रविचंद्रन अश्विन/मोहम्मद शमी.

वीरेंद्र सेहवागची टीम : केएल राहुल, देवदत्त पडीक्कल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली(कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एबी डी व्हीलियर्स, राशिद खान, युजवेंद्र चहल, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी, ईशान किशन(12वा खेळाडू)

इरफान पठाणची आयपीएल 2020 टीम : कायरन पोलार्ड (कर्णधार) केएल राहुल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, मार्कस स्टॉयनिस, राहुल तेवातिया, युजवेंद्र चहल, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

दरम्यान आतापर्यंत अजित आगरकर, इरफान पठाण, अजित आगरकर, आशिष नेहरा आणि वीरेंद्र सेहवाग या टीम इंडियाच्या माजी खेळाडू्ंनीही आपली बेस्ट टीम निवडली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | आशिष नेहराची आयपीएल 2020 मधील बेस्ट टीम, विराट-धवनला स्थान नाही

IPL 2020 | नजफगढचा नवाब वीरेंद्र सेहवागची आयपीएल 2020 मधील ड्रीम टीम, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी निवड

IPL 2020 | टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणची ड्रीम टीम, रोहित-विराटला डच्चू, पोलार्ड कर्णधारपदी

ipl 2020 best team of pragyan ojha and deepdas gupta to defeat five time champions mumbai

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.