Kedar Jadhav | आधी सोशल मीडियावर ट्रोल, आता केदार जाधवच्या नावे नकोसा विक्रम

चेन्नई सुपर किंग्जसचा फलंदाज केदार जाधवच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. | (Chennai Super Kings batsman Kedar Jadhav Set Bad Record In Ipl)

Kedar Jadhav | आधी सोशल मीडियावर ट्रोल, आता केदार जाधवच्या नावे नकोसा विक्रम
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 11:03 PM

दुबई : बुधवारी 7 ऑक्टोबरला कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यात चेन्नईचा अवघ्या 10 धावांनी पराभव झाला. विजयी आव्हानाच्या नजीक असताना चेन्नईचा फलंदाज केदार जाधवने (Kedar Jadhav) अतिशय संथ खेळी केली. यामुळे चेन्नईचा पराभव झाला, असं क्रिकेटचाहत्याचं म्हणनं आहे. केदारला त्याच्या या संथ खेळीमुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. ट्रोलिंग संपते न संपते, तितक्यात केदारच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.(Csk Kedar Jadhav Set Bad Record In Ipl)

काय आहे विक्रम?

केदारने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. या 6 सामन्यात त्याने अवघ्या 58 धावा केल्या आहेत. या एकूण 6 सामन्यात केदारने एकूण 59 चेंडूंचा सामना केला. मात्र या 59 चेंडूत केदारला एकही सिक्स लगावता आला नाही. म्हणजेच यंदाच्या मोसमात सर्वाधिक चेंडू खेळूनही सिक्स न लगावण्याचा विक्रम केदारच्या नावे झाला आहे.

केदारनंतर या यादीत किंग्जस इलेव्हन पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेसलचा दुसरा क्रमांक लागतो. ग्लेन मॅक्सवेलने 6 सामन्यात 56 चेंडूचा सामना केला आहे. मात्र या 56 चेंडूमध्ये मॅक्सवेललाही एकही षटकार खेचता आला नाही. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सनरायजर्स हैदराबादच्या केन विलियम्सन आहे. विलियम्सनने 4 सामन्यात एकूण 54 चेंडूंचा सामना केला आहे. त्यालाही एकही सिक्स ठोकता आला नाही.

केदारची चेन्नईतून हकालपट्टी करा

केदारच्या संथ खेळीप्रकरणी चेन्नई संघातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. केदारला संघाबाहेर काढा, अन्यथा आम्ही चेन्नईला समर्थन देणं बदं करु. तसेच चेन्नईचे सामनेही पाहणार नाही, अशी तंबीच नेटीझन्सनी दिली आहे.

वीरेंद्र सेहवागची खरमरीत टीका

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही केदार जाधव आणि रवींद्र जडेजा या चेन्नईच्या खेळाडूंना संथ खेळीमुळे धारेवर धरले. “कोलकाताने दिलेलं विजयी आव्हान चेन्नईने पूर्ण करायला हवं होतं. केदार जाधव आणि रवींद्र जडेजाने अनेक बॉल डॉट केले. यामुळे चेन्नईला विजयी आव्हान गाठता आले नाही, असं सेहवाग म्हणाला. तसेच चेन्नईचे काही फलंदाज हे फ्रेंचायजीला सरकारी नोकरी समजतात. चांगली कामगिरी करा अथवा नाही, पगार तर वेळेवर मिळतो”, अशी खरमरीत टीका सेहवागने केली.

संबंधित बातम्या :

Virendra Sehwag | चेन्नईला सरकारी नोकरी समजलेत, वीरेंद्र सेहवागची केदार जाधव-रवींद्र जडेजावर खरमरीत टीका

Kedar Jadhav : चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीनंतर समर्थकांची तंबी, केदार जाधवला संघाबाहेर काढा अन्यथा…… 

(Csk Kedar Jadhav Set Bad Record In Ipl)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.