IPL 2020 : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील चेन्नईचे आव्हान संपुष्टात, धोनीच्या नावे खराब विक्रमाची नोंद

चेन्नईला आयपीएलच्या 13 व्या मोसमात 6 सामन्यातच विजय मिळवता आला.

IPL 2020 : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील चेन्नईचे आव्हान संपुष्टात, धोनीच्या नावे खराब विक्रमाची नोंद
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 5:03 PM

दुबई : चेन्नई सुपर किंग्जसचे (Chennai Super Kings) आयपीएलच्या 13 व्या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं आहे. चेन्नईने रविवारी 1 नोव्हेंबरच्या सामन्यात पंजाबला पराभूत करत शेवट गोड केला. आयपीएलचं 13 वं पर्व चेन्नईसाठी निराशाजनक राहिलं. याआधी चेन्नईने खेळलेल्या प्रत्येक मोसमात प्ले ऑफमध्ये धडक मारली होती. या मोसमात चेन्नई आणि पर्यायाने कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni)  धमाकेदार कामगिरी करता आली नाही. धोनीला या मोसमात बॅटिंगने विशेष काही करता आले नाही. धोनीच्या नावावर 2 नकोसे विक्रम झाले आहेत.ipl 2020 chennai super kings skipper mahendra singh dhoni has set a bad record

एकही अर्धशतक नाही

धोनीने यंदाच्या मोसमातील सर्वच म्हणजे 14 सामने खेळले. या 14 सामन्यात धोनीला एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही. धोनीची नाबाद 47 धावा ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. आयपीएलच्या इतिहासात  धोनीने  याआधी अशी निराशाजनक कामगिरी केली नव्हती. धोनीने आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2008 पासून ते 2019 पर्यंत प्रत्येक मोसमात अर्धशतकी खेळी केली. मात्र धोनीला यंदा अशी कामगिरी करता आली नाही. धोनीने 2013 मध्ये 4 वेळा अर्धशतकी खेळी केली. होती. तर 2018 आणि 2019 मध्ये 3 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली होती.

धोनीचे आयपीएलमधील वर्षनिहाय अर्धशतक

2008 : 2 2009 : 2 2010 : 2 2011 : 2 2012 : 1 2013 : 4 2014 : 1 2015 : 1 2016 : 1 2017 : 1 2018 : 3 2019 : 3 2020 : 0

एका मोसमात कमी धावांची नोंद

चेन्नई आणि धोनीसाठी आयपीएलचा 13 वा मोसम निराशाजनक राहिला. या मोसमात कोणतीच गोष्ट चेन्नईच्या बाजूने पडली नाही. बॅटिंगने विरोधी गोलंदाजांचा समाचार घेणाऱ्या धोनीला यंदाच्या मोसमात चांगली बॅटिंग करता आली नाही. धोनीला या मोसमात एकूण 14 सामन्यात 200 धावाच करता आल्या. धोनीचा आयपीएलच्या एका मोसमातील धावांचा हा निच्चांक ठरला. धोनीने याआधी 2016 मध्ये 284 धावा केल्या होत्या. आयपीएल कारकिर्दीत धोनीने 2013 मध्ये 461 धावा केल्या होत्या.

धोनीच्या आयपीएलमधील वर्षनिहाय धावा

वर्ष : धावा

2008 : 414 2009 : 332 2010 : 287 2011 : 392 2012 : 358 2013 : 461 2014 : 371 2015 : 372 2016 : 284 2017 : 290 2018 : 455 2019 : 416 2020 : 200

“डेफिनेटली नॉट”

धोनी आयपीएलच्या 13 व्या  मोसमानंतर निवृत्ती घेणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र धोनीने पुढील वर्षातही आयपीएलमध्ये खेळणार असल्याचं म्हटलं. चेन्नई विरुद्ध पंजाब यांच्यात रविवारी (1 नोव्हेंबर) सामना खेळण्यात आला. यावेळी टॉसदरम्यान डॅनी मॉरिसनने धोनीला आयपीएलमधील निवृत्तीबद्दल प्रश्न विचारला. “येलो जर्सीमधला तुझा अखेरचा सामना आहे का”? असा प्रश्न धोनीला विचारण्यात आला. या प्रश्नावर धोनीने हसतमुख चेहऱ्याने “डेफिनेटली नॉट” असं उत्तर दिलं. “माझा आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा सध्या कोणताही विचार नाही. मी चेन्नईसाठी आयपीएल खेळत राहीन,’ असं स्पष्ट शब्दात धोनीने सांगितलं. यामुळे धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीविषयीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

आयपीएलमधून निवृत्ती नाहीच, चेन्नईसाठी खेळत राहणार, धोनीचा निर्धार

IPL : सुरुवातीला 2 सामन्यात शून्यावर बाद, नंतर लागोपाठ 3 अर्धशतकं, ऋतुराज गायकवाडची सेहवागशी बरोबरी

ipl 2020 chennai super kings skipper mahendra singh dhoni has set a bad record

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.