IPL 2020, CSK vs Kxip : चेन्नईचा 9 विकेट्सने दणदणीत विजय, पंजाबचं आव्हान संपुष्ठात, कर्णधार केएल राहुल निराश
चेन्नईने पराभूत केल्याने पंजाबचे आव्हान संपुष्ठात आले आहे.
![IPL 2020, CSK vs Kxip : चेन्नईचा 9 विकेट्सने दणदणीत विजय, पंजाबचं आव्हान संपुष्ठात, कर्णधार केएल राहुल निराश IPL 2020, CSK vs Kxip : चेन्नईचा 9 विकेट्सने दणदणीत विजय, पंजाबचं आव्हान संपुष्ठात, कर्णधार केएल राहुल निराश](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/11/01235759/ipl-2020-csk-vs-kxip-chennai-win-by-9-wickets-punjab-challenge-over-skipper-kl-rahul-disappointed.png?w=1280)
अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) 53 वा सामना चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात चेन्नईने पंजाबवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने या मोसमातील आपला शेवट गोड केला. मात्र चेन्नईच्या विजयामुळे पंजाब प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुल निराश झालेला पाहायला मिळाला. ipl 2020 csk vs kxip chennai win by 9 wickets punjab challenge over skipper kl rahul disappointed
केएल पराभवानंतर काय म्हणाला?
“आम्ही निराशाजनक कामगिरी केली. आमच्यासाठी प्ले ऑफच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा होता. या सामन्यात मोठी धावसंख्या करण्याचा दबाव आमच्यावर होता. मात्र आम्हाला चेन्नईला विजयासाठी मोठं आव्हान देता आलं नाही, अशी खंतही केएलने व्यक्त केली. केएलने सुरुवातीच्या सामन्यांचाही उल्लेख केला. सुरुवातीच्या 7 सामन्यात आम्हाला केवळ 1 विजय मिळवता आला. मात्र आम्ही अनेक सामन्यात चांगली झुंज दिली”, असंही केएल नमूद केलं.
“मोसमातील पहिल्या टप्प्यात आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही. आम्ही पहिल्या टप्प्यात अपयशी राहिलो. मात्र दुसऱ्या टप्प्यात आम्ही चांगली कामगिरी केली. तसेच चांगले पुनरागमनही केलं. यासाठी आम्हाला एक संघ म्हणून अभिमान आहे. जे झालं ते विसरुन, पुढील वर्षी यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करु”, असा आशावाद केएलने व्यक्त केला.
पंजाबने या मोसमातील एकूण 14 सामन्यांमधून एकूण 6 सामन्यात विजय मिळवला. विशेष म्हणजे शेवटच्या 7 सामन्यांमधून 5 सामन्यात पंजाबने विजय मिळवला.
केएलची कमाल कामगिरी
केएलने यंदाच्या मोसमातील 14 सामन्यात 129.34 च्या स्ट्राईक रेटने आणि 55.83 च्या सरासरीने 670 धावा केल्या. केएलने यामध्ये 1 शतक आणि 5 दणदणीत अर्धशतकं ठोकली. नाबाद 132 ही त्याची या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. केएलने यंदाच्या मोसमात बॅटिंगने दमदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर केएलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020, CSK vs KXIP : ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी, चेन्नईचा पंजाबवर 9 विकेट्सने दणदणीत विजय
ipl 2020 csk vs kxip chennai win by 9 wickets punjab challenge over skipper kl rahul disappointed