IPL 2020, CSK vs RCB : विराटच्या बंगळुरुकडून धोनीच्या किंग्जसवर 37 धावांनी मात

| Updated on: Oct 16, 2020 | 1:02 PM

बंगळुरुने या विजयासह पॉइंट्संटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. | (Royal Challengers Bangalore won by 37 runs Against Chennai Super Kings)

IPL 2020, CSK vs RCB : विराटच्या बंगळुरुकडून धोनीच्या किंग्जसवर 37 धावांनी मात
Follow us on

दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) चेन्नई सुपर किंग्जसचा (Chennai Super Kings) 37 धावांनी पराभव केला आहे. बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून फक्त 132 धावाच करता आल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि नारायण जगदीशनचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. चेन्नईकडून अंबाती रायुडूने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर नारायण जगदीशनने 33 धावा केल्या. फॅफ डु प्लेसिलाही विशेष करता आले नाही. तसेच या सामन्यात धोनीने पुन्हा निराशा केली. धोनी 10 धावांवर बाद झाला. बंगळुरुकडून ख्रिस मॉरीसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुदंरने 2 विकेट्स घेत मॉरीसला चांगली साथ दिली. तसेच इसरु उडाना आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Royal Challengers Bangalore won by 37 runs Against Chennai Super Kings) लाईव्ह स्कोअरकार्ड

त्याआधी बंगळुरुने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहलीने केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून बंगळुरुला 169 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद 90 धावा केल्या. या खेळीत विराटने 4 सिक्स आणि 4 फोर लगावले. विराटनंतर सलामीवीर देवदत्त पडिक्कलने 33 धावांची खेळी केली. तसेच 22 धावांची नाबाद खेळी करत शिवम दुबेने विराटला चांगली साथ दिली. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर दीपक चहर आणि सॅम करनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

[svt-event title=”चेन्नईला आठवा धक्का” date=”10/10/2020,11:10PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईला सातवा धक्का” date=”10/10/2020,11:10PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईला सहावा धक्का” date=”10/10/2020,11:06PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईला पाचवा धक्का” date=”10/10/2020,10:59PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईला मोठा धक्का, धोनी आऊट” date=”10/10/2020,10:51PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”नारायण जगदीशन रनआऊट” date=”10/10/2020,10:47PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”10/10/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नई 12 ओव्हरनंतर” date=”10/10/2020,10:27PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईला दुसरा धक्का” date=”10/10/2020,9:58PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईला पहिला झटका” date=”10/10/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नई 1 ओव्हरनंतर” date=”10/10/2020,9:35PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”10/10/2020,9:31PM” class=”svt-cd-green” ]

 

[svt-event title=”कोहली-दुबे जोडीची अर्धशतकी भागीदारी” date=”10/10/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”विराटचे अर्धशतक” date=”10/10/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुला चौथा धक्का” date=”10/10/2020,8:43PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पडिक्कल पाठोपाठ डिव्हीलियर्स बाद” date=”10/10/2020,8:28PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का” date=”10/10/2020,8:25PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुचा 9 ओव्हरनंतर स्कोअर” date=”10/10/2020,8:19PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुच्या 50 धावा पूर्ण” date=”10/10/2020,8:15PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये बंगळुरु” date=”10/10/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”10/10/2020,7:46PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”10/10/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुचे 11 शिलेदार” date=”10/10/2020,7:43PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईचे अंतिम 11 खेळाडू” date=”10/10/2020,7:42PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय ” date=”10/10/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]

चेन्नईला यंदाच्या मोसमात विशेष काही करता आलेले नाही. चेन्नई सातत्याने निराशाजनक कामगिरी करत आहे. चेन्नईला आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यातातून फक्त 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे. चेन्नई 4 पॉइंट्ससह 6 व्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरुने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. बंगळुरुने पॉइंट्संटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर आहे.

चेन्नई बंगळुरुवर वरचढ

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत चेन्नई आणि बंगळुरु एकूण 24 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 24 पैकी 15 सामन्यात चेन्नईने बंगळुरुवर मात केली आहे. तर बंगळुरुला 8 मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

चेन्नई सुपर किंग्जस : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबती रायडू, फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, पीयूष चावला, इमरान ताहीर, मिचेल सेंटनर, जोश हेझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलियर्स, पार्थिव पटेल, अॅरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंगटन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झॅम्पा

संबधित बातम्या :

IPL 2020, KXIP vs KKR LIVE : कोलकाताचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

(Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live)