IPL 2020,Qualifier 2 DCvsSRH : फायनलमध्ये न पोहचणं ही आमच्यासाठी शरमेची बाब : केन विल्यमसन
केन विल्यमसनने क्वालिफायर 2 सामन्यात दिल्लीविरुद्ध 67 धावांची खेळी केली.
अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील क्वालिफायर 2 (Qualifier 2) सामना रविवारी 8 नोव्हेंबरला खेळण्यात आला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunriser Hyderabad)यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने हैदराबादवर 17 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. तर हैदराबादचे आव्हान संपुष्टात आले. आम्ही अंतिम सामन्यात प्रवेश करु शकलो नाही, ही आमच्यासाठी शरमेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया हैदराबादचा फलंदाज केन विल्यम्सनने (Kane Williamson)सामन्यानंतर दिली. ipl 2020 dc vs srh qualifier 2 it is a shame we didn’t make it to the finals said srh batsman Kane Williamson
“दिल्ली एक मजबूत टीम आहे. दिल्लीची साखळी फेरीत चांगली कामगिरी राहिली. मात्र त्यानंतर त्यांनी सलग 4 सामने गमावले. पण यानंतर चांगले पुनरागमन केले. आम्हालाही काही सामन्यांसाठी चांगला सूर गवसला होता. दिल्लीने या क्वालिफायर 2 मध्ये दमदार कामगिरी केली. दिल्लीने आम्हाला या सामन्यात विजयासाठी तगडं आव्हान दिलं”, असं केन सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला.
“दुसऱ्या डावात म्हणजेच विजयी आव्हानाचं पाठलाग करताना जोखीम प्तकारावी लागते. विजयी आव्हानाचे पाठलाग करताना आमची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर आम्ही चांगली भागीदारी केली. या भागीदारीमुळे सामन्यातले आमचे आव्हान कायम ठेवले होते. मात्र यानंतर आम्ही फायनलमध्ये पोहचू शकलो नाही. ही आमच्यसाठी लाजीरवाणी बाब आहे. मात्र आमच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबाबत आम्हाला अभिमान आहे”, असंही केनने यावेळेस नमूद केलं.
“आमच्यासाठी आयपीएलचा 13 वा मोसम चांगला राहिला. या मोसमातील काही अटीतटीच्या सामन्यात आमचा पराभव झाला. कदाचित आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्यात कमी पडलो. या मोसमात प्रत्येक टीमने चांगली कामगिरी केली. प्रत्येक संघ एकमेकांवर वरचढ ठरला. आम्ही प्रतिकूल परिस्थितीत दमदार कामगिरी केली. यासाठी आम्ही समाधानी आहोत”, असंही केनने म्हटलं.
दरम्यान या क्वालिफायर 2 सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने हैदराबादला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले. मात्र हैदराबादला 172 धावाच करता आल्या. मंगळवारी 10 नोव्हेंबरला मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात अंतिम सामना खेळण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020, QUALIFIER 2, DC vs SRH : दिल्लीची हैदराबादवर 17 धावांनी मात, अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार
ipl 2020 dc vs srh qualifier 2 it is a shame we didn’t make it to the finals said srh batsman Kane Williamson